आज, उत्पत्ती एकादशी, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे. या दिवशी देवी एकादशीचा जन्म झाला, म्हणून या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी एकादशीची पूजा केली जाते, ज्यामुळे सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो.
आज उत्पत्ती एकादशी
आज उत्पत्ती एकादशी शनिवारी, 15 नोव्हेंबर रोजी आहे. पंचांगानुसार मार्गशीर्ष कृष्ण एकादशी तिथी 15 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजून 49 मिनिटांपासून 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 02 वाजून 37 मिनिटांपर्यंत आहे. 15 नोव्हेंबर 2025 पासून तुम्ही एकादशीचे व्रत सुरू करू शकता. उदय तिथीनुसार उत्पत्ती एकादशीचे व्रतशनिवारी, 15 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.

पूजा विधी
- सकाळी लवकर उठून स्नान करून देवघराची स्वच्छता करावी.
- भगवान विष्णूंना गंगाजलाने स्नान घालावे.
- पिवळे चंदन आणि फुले अर्पण करावी.
- भगवान विष्णूंची मूर्ती स्थापित करून तुपाचा दिवा लावावा.
- देवांना नैवेद्य दाखवावा आणि तुळशीची पाने अर्पण करावी.
- एकादशीची कथा वाचावी किंवा ऐकावी.
- पूजा झाल्यावर शुद्ध तुपाच्या दिव्याने आरती करावी.
- हा उपवास संपूर्ण दिवस केला जातो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला पारण विधी करून उपवास सोडला जातो.
उत्पत्ती एकादशीचे महत्त्व
पौराणिक मान्यतेनुसार, याच दिवशी देवी एकादशीचा जन्म झाला होता, म्हणून या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. उत्पत्ती एकादशीचा उपवास केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. हे व्रत केल्याने मोक्षप्राप्ती होते आणि विष्णूलोकात स्थान मिळते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते. हे व्रत आध्यात्मिक शांती मिळवण्यासाठी देखील महत्त्वाचे मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











