नजर लागण्यापासून बचाव
लग्नात मुंडावळ्या आणि बाशिंग बांधण्यामागे मुख्य कारण म्हणजे नजर लागू नये म्हणून वधू-वरांचे संरक्षण करणे आहे. मुंडावळ्या आणि बाशिंगमुळे लोकांचे लक्ष वधू-वरांच्या चेहऱ्यांवरून हटून त्यांच्या डोक्यावरील मुंडावळ्या आणि बाशिंगकडे जाते. यामुळे त्यांना वाईट नजरेपासून वाचवता येते.
एकत्रीकरण आणि अतूट बंधनाचे प्रतीक
लग्नामध्ये मुंडावळ्या आणि बाशिंग बांधल्या जातात कारण त्या वधू आणि वर यांच्या एकत्रीकरणाचे आणि अतूट बंधनाचे प्रतीक आहेत.

लग्नाच्या विधींचा अविभाज्य भाग
लग्न समारंभात हे एक महत्त्वाचे आणि पारंपारिक प्रतीक आहे, जे वधू-वरांचे सौंदर्य वाढवते आणि त्यांच्या लुकला पूर्ण करते. ही प्रथा महाराष्ट्रातील लग्नाच्या विधींचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे.
शास्त्रीय आणि भावनिक कारण
लग्नासारख्या शुभ प्रसंगी वधू-वर भावनिकदृष्ट्या एका वेगळ्याच अवस्थेतून जात असतात, त्यामुळे या गोष्टी त्यांना या तणावातून बाहेर काढण्यास मदत करतात अशा स्थितीत डोक्यावर पट्टी बांधल्यासारख्या मुंडावळ्या बांधल्यास डोकं शांत ठेवण्यास मदत मिळते, असं म्हणतात.











