Champa Shashti 2025: चंपाषष्ठीचे काय आहे महत्त्व? जाणून घ्या पूजा-विधी…

Asavari Khedekar Burumbadkar

मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला चंपाषष्ठीचा उत्साह साजरी करण्यात येते. यंदा चंपाषष्ठी 26 नोव्हेंबरला म्हणजेच आज साजरी करण्यात येणार आहे. चंपाषष्ठीचे महत्व,पूजा-विधी जाणून घ्या…

चंपाषष्ठीची कथा

मणी आणि मल्ल या दोन राक्षसांच्या त्रासापासून लोकांना मुक्त करण्यासाठी देवाने (मल्हारी किंवा खंडोबा) त्यांचा वध केला होता, या घटनेच्या स्मरणार्थ चंपाषष्ठी साजरी केली जाते. या सहा दिवसांच्या उत्सवाला ‘खंडोबा नवरात्र’ असेही म्हणतात, ज्याची सुरुवात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून होते आणि षष्ठीला याची सांगता होते. 

चंपाषष्ठीचे महत्व

मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी मार्तंड भैरव रूपात अवतार घेतला आणि सहा दिवस युद्ध करून षष्ठीला त्यांचा वध केला. या घटनेच्या स्मरणार्थ आणि खंडोबाच्या विजयाचा उत्सव म्हणून चंपाषष्ठी साजरी केली जाते. चंपाषष्ठीचे व्रत केल्याने किंवा तळी भरल्याने भक्तांना सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

पूजा विधी

आज, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी चंपाषष्ठी आहे, जी मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला साजरी केली जाते. या दिवशी खंडोबाच्या षडरात्रोत्सवाची सांगता होते, ज्यामध्ये भक्त उपवास करतात, पूजा करतात आणि तळी भरतात. खंडोबाने मणी आणि मल्ल राक्षसांचा वध करून लोकांचे रक्षण केले, या घटनेच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो.

  • देवघर आणि घर स्वच्छ करा.
  • खंडोबाची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करून तयार ठेवा.
  • खंडोबाचे आवाहन करा.
  • मूर्तीला अभिषेक करा.
  • गंध, फुल, दुर्वा, हळद, कुंकू, बेलपत्र अर्पण करा.
  • धूप-दीप दाखवा.
  • प्रसाद किंवा नैवेद्य अर्पण करा.
  • प्रदक्षिणा घालून प्रार्थना करा. 
  • पूजेनंतर तळी भरण्याचा विधी केला जातो.
  • ताम्हणात हळद, कुंकू, फुले घालून ‘सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार’ असे बोलून तीन वेळा वर-खाली करा. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या