लक्ष्मी देवीची अनेक प्रकारची चित्रे बाजारात दिसतात आणि ते खरेदी करण्याचा आपल्याला मोहदेखील होतो, पण आपण विचार करूनच ती खरेदी करून घरी ठेवली पाहिजेत. कारण देवी लक्ष्मीचे फोटो कुठे लावावे याचं एक शास्त्र आहे. हिंदू धार्मिक ग्रंथ आणि वास्तुशास्त्रानुसार, घरात देवी लक्ष्मीचा अयोग्य फोटो लावल्याने किंवा तिचे चित्र चुकीचे लावल्याने गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. जाणून घेऊया देवी लक्ष्मीचे कोणत्या प्रकारचे फोटो लावावेत?
कोणत्या प्रकारचा फोटो ठेवावा?
बसलेली लक्ष्मी
लक्ष्मीचा बसलेला फोटो आपण जर घरात लावला तर लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि तिच्या भक्तांना आशीर्वाद देते असं म्हटलं जातं. त्यामुळे घरात सुखसमृद्धी हवी असेल तर बसलेल्या लक्ष्मीचा फोटो लावावा. स्थिर आणि शांततेसाठी बसलेल्या लक्ष्मीचा फोटो ठेवावा.

आशीर्वाद देणारी लक्ष्मी
लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आशीर्वाद देणाऱ्या स्थितीत असावा. तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा फोटो आशीर्वाद देणाऱ्या स्थितीत असावा, पण तो उभा नसावा. फोटोमध्ये लक्ष्मी देवी आनंदी आणि शांत दिसावी, हातातून धनवृष्टी होत असावी आणि त्यांच्यासोबत भगवान विष्णूंचा फोटो असणे शुभ मानले जाते.
पाण्याचा वर्षाव करणारे हत्ती
लक्ष्मीच्या चित्रात पाण्याचा वर्षाव करणारे हत्ती असणे शुभ मानले जाते.
गणपतीसोबत
लक्ष्मीच्या फोटोसोबत गणपतीची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. लक्ष्मीच्या फोटोसोबत गणपतीची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते, कारण गणपती विघ्नहर्ता आहे आणि लक्ष्मी धन-संपत्तीची देवी आहे. लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती एकत्र ठेवताना, लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती ठेवावी.
उभी लक्ष्मी
घरात कधीही लक्ष्मीची उभी मूर्ती ठेवू नका. असे केल्याने घरात नकारात्मकता येऊ शकते. तसंच घरामध्ये सतत वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सहसा माता लक्ष्मी उभी असणारी मूर्ती वा फोटो घरात ठेऊ नये.
फोटोची योग्य जागा आणि दिशा
- ईशान्य कोपरा: पूजेसाठी ईशान्य कोपरा सर्वात शुभ मानला जातो.
- पूर्व किंवा उत्तर दिशा: फोटोची दिशा पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावी, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचा संचार होतो.
- अशुभ दिशा: लक्ष्मीचा फोटो दक्षिणेकडे तोंड करून ठेवू नये, कारण ते अशुभ मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)