वास्तुशास्त्रानुसार, झोपताना डोक्याची दिशा आपल्या आरोग्यावर, मानसिक शांतीवर आणि उर्जेवर खोलवर परिणाम करते. योग्य दिशेने डोके ठेवून झोपल्याने केवळ गाढ आणि शांत झोप येत नाही तर जीवनात सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते.
झोपताना डोकं कोणत्या दिशेला ठेवाव?
वास्तुशास्त्रानुसार, झोपताना डोके दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडे ठेवणे सर्वोत्तम मानले जाते, ज्यामुळे शांत झोप, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. दक्षिण दिशा धन आणि समृद्धी आणते, तर पूर्वेकडे डोके ठेवल्याने उगवत्या सूर्याच्या सकारात्मक ऊर्जेचा फायदा होतो, असे वास्तुशास्त्र सांगते. दक्षिण ही सर्वात उत्तम दिशा मानली जाते. यामुळे गाढ आणि शांत झोप लागते, तसेच घरात सुख-समृद्धी येते. पूर्व ही दिशा सकारात्मक ऊर्जा आणि उत्तम आरोग्यासाठी चांगली आहे, कारण ती उगवत्या सूर्याची दिशा आहे.

कोणत्या दिशेला डोकं ठेवू नये ?
उत्तरेकडे डोके ठेवून झोपणे टाळावे. यामुळे आरोग्याच्या समस्या आणि झोपेत अडथळे येऊ शकतात, असे वास्तुशास्त्र सांगते. उत्तर दिशेला डोके ठेवून झोपणे टाळावे, कारण यामुळे झोपेमध्ये अडथळे आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात. पश्चिम दिशा मध्यम स्वरूपाची मानली जाते, पण उत्तर दिशा पूर्णपणे टाळणेच योग्य आहे.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)