Kalbhairav : कालभैरव कोण आहेत? जाणून घ्या पूजा करण्याचे फायदे

Asavari Khedekar Burumbadkar

कालभैरवाची पूजा केल्याने वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते, भीती, संकटं आणि आपत्ती दूर होतात आणि शत्रूंवर विजय मिळतो. ही पूजा ग्रहांच्या वाईट प्रभावांना कमी करण्यासही मदत करते, ज्यामुळे शनि, राहू आणि केतूमुळे होणारे त्रास कमी होतात.

कालभैरव कोण आहेत ?

कालभैरव हे भगवान शंकराचे उग्र आणि शक्तिशाली रूप आहे. ‘काळ’ म्हणजे काळ/मृत्यू आणि ‘भैरव’ म्हणजे भयंकर/उग्र. म्हणजेच जो काळालाही नियंत्रित करतो, तो कालभैरव होय. ते वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी प्रकट झाले आहेत. कालभैरवाला “काळाचा स्वामी” म्हणूनही ओळखले जाते आणि तो नकारात्मक शक्ती आणि वाईट आत्म्यांचा नाश करतो.

कालभैरवाची पूजा केल्याने काय होते?

  • कालभैरवाची पूजा केल्याने वाईट शक्ती, भूत-प्रेत आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते.
  • भीती, संकटं आणि आपत्ती दूर होतात. यामुळे जीवनातील समस्यांना तोंड देण्यासाठी धैर्य मिळते.
  • ज्या लोकांना शनि, राहू किंवा केतूमुळे त्रास होत असेल, त्यांच्यासाठी कालभैरवाची पूजा करणे विशेष लाभदायक असते.
  • काल भैरव पूजा ही मोठ्या आजारांपासून आणि त्रासांपासून मुक्ती देण्यासाठी उपयुक्त मानली जाते.
  • काल भैरवाची पूजा केल्याने करिअर आणि व्यवसायात यश आणि समृद्धी येते.
  • कालभैरवाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मकता आणि शौर्य वाढते. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या