आपल्या घरात आपण काहीबाबींकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही कंगाल होऊ शकतात. वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघर हा महत्त्वाचा भाग आहे. किचनबाबत काही नियम आहेत. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील नळ देखील कधीकधी वास्तुदोष निर्माण करू शकतो. गळणारा नळ ही केवळ एक किरकोळ समस्या नसून, वास्तूशास्त्रानुसार ती घरात अनेक समस्या आणू शकते, म्हणून याकडे दुर्लक्ष करू नये. जाणून घेऊयात…
किचनमधील नळ गळका असेल तर…
वास्तूशास्त्रानुसार, घरातील गळणारा नळ शुभ मानला जात नाही, कारण यामुळे वास्तुदोष निर्माण होतो, घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि आर्थिक समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे पैशांची हानी होते आणि घरात गरिबी येऊ शकते; म्हणून, नळ त्वरित दुरुस्त करणे आवश्यक आहे, अन्यथा यामुळे घरात दुःखाचे डोंगर कोसळू शकतात, यामुळे वास्तुदोष निर्माण होऊन तुमच्या जवळील पैसा पाण्यासारखाच वाहू लागतो. तुम्ही कितीही पैसे कमावले तरी ते टिकत नाहीत असे वास्तुशास्त्र सांगते.

घरात समस्या निर्माण होतात
वास्तूशास्त्रानुसार, घरातील गळका नळ हे आर्थिक नुकसान, पैशाची उधळपट्टी आणि घरात नकारात्मक ऊर्जा आणण्याचे लक्षण मानले जाते, विशेषतः स्वयंपाकघरातील नळ गळणे अशुभ मानले जाते कारण ते अग्नी (अग्निदेवता) आणि पाणी यांच्यात संघर्ष निर्माण करते, ज्यामुळे घरात समस्या वाढू शकतात; म्हणून नळाची गळती त्वरित दुरुस्त करणे आवश्यक आहे.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











