Dev Diwali Wishes in Marathi : कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा…

कार्तिक मासात येणाऱ्या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा म्हणतात, यादिवशी त्रिपुरासुराच्या वधानंतर जगातील सर्व देवतांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली, म्हणून याला देव दिवाळी असेही म्हणतात. कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या प्रियजणांना द्या शुभेच्छा.

कार्तिक मासात येणाऱ्या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा म्हणतात, यादिवशी त्रिपुरासुराच्या वधानंतर जगातील सर्व देवतांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली, म्हणून याला देव दिवाळी असे म्हणतात. देव दिवाळीचा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा आणि कार्तिक पौर्णिमा म्हणून देखील ओळखला जातो. अशा या शुभदिनाच्या तुमच्या मित्र परिवाराला काही खास शुभेच्छा देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करा….

देव दिवाळीचे महत्व

धार्मिक मान्यतेनुसार, त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा अत्याचार तिन्ही लोकांमध्ये वाढला होता. देव, देवी आणि मानव सर्वजण दुःखी झाले होते. भगवान शिवाने दैत्य राजा त्रिपुरासुराचा वध करून देवतांना त्याच्या दहशतीतून मुक्त केले. त्या दिवशी, काशीमध्ये गंगेच्या काठावर देव-देवता एकत्र आल्या. त्यांनी गंगेत स्नान केले, प्रदोष काळात भगवान शंकराची पूजा केली आणि दिवे लावले. कार्तिक पौर्णिमेला साजरी होणारी देवांची दिवाळी होती. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला काशी शहरातील गंगेच्या घाटांवर देव दिवाळी साजरी केली जाते.

प्रियजनांना देव दिवाळीच्या द्या खास शुभेच्छा…

कार्तिक पौर्णिमेच्या आनंदोत्सवानिमित्त
तुम्हाला उत्तम आरोग्य, संपत्ती, शांती
आणि समृद्धी लाभो हीच सदिच्छा
कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा..!

नदीच्या तिरी असंख्य दिव्यांची आरास
त्रिपुरारी ठरो सर्वांसाठी खास
कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही दिशा
घेऊन येवो नवी उमेद नवी आशा,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
देव दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

चांदण्यात न्हावून निघाली चांदरात,
पौर्णिमेच्या चंद्राचा पसरला रुपेरी प्रकाश…
देव दिवाळीची दिव्यांची आरास
नदीकाठी सजला लख्ख लख्ख प्रकाश…
देव दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा!

कार्तिक पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि
दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो…
हिच आमची मनोकामना…
देव दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

स्नेहाचा सुगंध दरवळला, देव दिवाळीचा सण आला,
एकच मागणे या कार्तिक पौर्णिमेला, सौख्य समृद्धी लाभो सर्वांना
देव दिवाळीच्या शुभेच्छा!

तेजोमय झाला आजचा प्रकाश
जुना कालचा काळोख
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास
सोन्यासारख्या लोकांसाठी खास
देव दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

पहिला दिवा लागेल दारी
सुखाचा किरण येईल घरी
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
तुम्हा सर्वांना देव दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

मांगल्याची चाहूल लागली
शब्दांचीही सुमने फुलती
येता घरोघरी देव दिवाळी
कार्तिक पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
विनंती आमची परमेश्वराला
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला
देव दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News