कार्तिक मासात येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते. या दिवशी घराघरात दिवे प्रज्वलित केले जातात. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला शिव आणि विष्णू यांची भेट होते. म्हणून घराघरात दिवे प्रज्वलीत केले जातात. महाराष्ट्रातील मंदिरामध्ये तसेच घरात दीवे लावून देवदिवाळी साजरी केली जाते. अशा या ‘त्रिपुरारी पौर्णिमे’निमित्त आपल्या आप्तजनांना द्या मंगलमय शुभेच्छा !
त्रिपुरारी पौर्णिमा
पौराणिक कथेनुसार,कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. असे म्हणतात की या राक्षसाने देवांना प्रचंड त्रास दिला होता. तेव्हा सर्व देवतांनी भगवान शंकराचे स्मरण करून त्रिपुरासुराचा अंत करण्याचे गार्हाणे घातले. भगवान शंकरानी कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केल्याने या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हंटले जाते. यादिवशी देवतांनी आनंदाने सर्वत्र दिवे लावून दीपोत्सव साजरा केला होता म्हणूनच यादिवशी देवदिवाळी साजरी केली जाते.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या द्या खास शुभेच्छा…
शिवप्रभू आणि लक्ष्मीपूजेने प्रसन्न होईल वातावरण
आनंद, उत्साह आणि सुख-समृद्धीला येवो उधाण
या पवित्र सणानिमित्त पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता दूर होवो
तुमच्यावर सुख, संपत्ती, आरोग्याच्या वर्षाव होवो
त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
सण तिमिरातून तेजाकडे नेणारा
सण प्रकाशाची वाट दाखवणारा
सण कर्तृत्वाची पहाट उगवणारा
सण नवी उमेद काजळी जागवणारा
सण नात्यांचे रेशीम बंध घट्ट करणारा
त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्तम आरोग्य, संपत्ती आणि सुख लाभो सर्वांना
पवित्र दिनी शिवप्रभू पूर्ण करोत तुमच्या मनोकामना
त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्वत्र प्रेमाच्या नात्यांचा सुगंध दरवळला
प्रकाशाचा आणि आनंदाचा पवित्र सण आला
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ता एकच मागणे परमेश्वराला
सुख, समृद्धी, आनंद आणि आरोग्य लाभो सर्वांना
त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
पौर्णिमेच्या मुहूर्तावर तुम्हाला लाभो शुभ आशिर्वाद
शिवप्रभूंची तुमच्यावर तुमच्यावर राहो सदैव कृपा
तुम्हाला सर्वांना, त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
त्रिपुरारी पौर्णिमेच्या सणाला उजळू दे आकाश
सर्वत्र पसरू दे सकारात्मकतेचा लख्ख प्रकाश
जुळावे नवे बंध प्रेमाचे आणि आनंदाचे हीच इच्छा
त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
सौभाग्याचे दीप उजळती, मांगल्याची चाहूल लागली,
शब्दांचीही सुमने फुलती, येता घरोघरी देव दीपावली
त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघोही
दिशा घेवोनि येवो नवी उमेद नवी आशा,
त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
नव्या सणाला उजळू दे आकाश,
सर्वत्र पसरु दे लख्ख प्रकाश,
आज कार्तिक पौर्णिमेचा सण खास,
त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











