देव दिवाळी 5 नोव्हेंबर 2025 रोजी म्हणजेच आज साजरी होणार आहे. कार्तिक पौर्णिमेला येणारा हा उत्सव त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. देव दिवाळीला दिवे लावण्याचा शुभ मुहूर्त काय? जाणून घ्या…
देव दिवाळीला दिवे लावण्याचा शुभ मुहूर्त
हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जाणारा देव दिवाळीचा उत्सव यावर्षी 5 नोव्हेंबर 2025 रोजी म्हणजेच आज साजरा होणार आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हा सण येतो, ज्याला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात.

देव दीपावलीच्या दिवशी, प्रदोष काळात दिवे लावले जातील. देव दीपावलीच्या प्रदोष काळात दिवे लावण्याचा शुभ काळ संध्याकाळी 5 वाजून 15 मिनिट ते 7 वाजून 50 मिनिटांपर्यंत असून त्या दिवशी देव दीपावलीचा शुभ काळ 2 तास 35 मिनिटं असणार आहे. हा मुहूर्त दीपदान करण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो.
देव दिवाळीला किती दिवे लावावेत?
देव दिवाळीला दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी विषम संख्येचे दिवे जसे की 5, 7, 11, 21, 51 किंवा 101 दिवे लावू शकता. वर्षभरात येणाऱ्या सर्व पौर्णिमांचे फळ मिळावे यासाठी 365 दिवे प्रज्वलित करण्याची परंपरा आहे.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











