देव दिवाळी 21 नोव्हेंबर 2025 रोजी म्हणजेच शुक्रवारी साजरी होणार आहे. देव दिवाळीच्या दिवशी, भगवान शिव, भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. या दिवशी घरात दिवे लावणे, दीपदान करणे आणि शक्य असल्यास गंगास्नान करणे शुभ मानले जाते. देव दिवाळी कधी आहे आणि पूजा कशी करावी ते जाणून घेऊयात…
कधी आहे देव दिवाळी?
हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जाणारा देव दिवाळीचा उत्सव यावर्षी 21 नोव्हेंबर 2025 रोजी म्हणजेच शुक्रवारी साजरा होणार आहे.

देव दिवाळीचे महत्त्व
देव दिवाळी हा हिंदू धर्मातील एक पवित्र दिवस मानला जातो, ज्या दिवशी घरात आणि धार्मिक स्थळांवर खास पूजा केली जाते. हा सण अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगुलपणाचा विजय दर्शवतो. या दिवशी ‘दीपदान’ करण्याचे विशेष महत्त्व आहे. घरांमध्ये आणि देवळांमध्ये दिवे लावले जातात. या दिवशी अनेक धार्मिक स्थळांवर दिवे लावून देवदेवतांचे पूजन केले जाते, तसेच घरातही दिव्यांची रोषणाई केली जाते.
देवदिवाळी हा सण कोकणात ‘देवांचे नैवेद्य’ म्हणून ओळखला जातो आणि तो ‘मार्गशीर्ष प्रतिपदेला’ साजरा होतो. या दिवशी लोक विविध तळलेल्या पदार्थांसोबत पुरणाचे कडबू, भरड्याचे वडे आणि सांज्याचे घारगे यांसारखे खास पदार्थ नैवेद्य म्हणून बनवतात. या सणाचे एक महत्त्वाचे धार्मिक महत्त्व म्हणजे या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला आणि तेव्हापासून हा दिवस देवांच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.
देव दिवाळी साजरी करण्याची पद्धत
- घरांमध्ये आणि देवळांमध्ये दिवे लावले जातात. या दिवशी अनेक धार्मिक स्थळांवर दिवे लावून देवदेवतांचे पूजन केले जाते, तसेच घरातही दिव्यांची रोषणाई केली जाते.
- देव दिवाळी निमित्त घरातील देव्हाऱ्यात तेलाचे किंवा तुपाचे दिवे लावले जातात.
- देव्हाऱ्यातील देवांना पंचामृताचा अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्याने स्नान घालावे.
- या सणाला ‘देवांचे नैवेद्य’ म्हणतात आणि लोक खास नैवेद्य बनवतात.
- या दिवशी घरातील कुलदेवता व इष्टदेवता यांच्याखेरीज स्थानदेवता, वास्तुदेवता, ग्रामदेवता आणि गावातील अन्य देवता. यांना त्यांच्या मानाचा भाग अर्थात नैवेद्य दाखवला जातो.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











