Dev Diwali 2025 : देव दिवाळीला कोणत्या देवाची पूजा केली जाते? जाणून घ्या देव दिवाळीचे महत्व…

Asavari Khedekar Burumbadkar

देव दिवाळी किंवा देव दिपावली हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. देव दीपावली दिवाळीच्या 15 दिवसांनी येते. कार्तिक पौर्णिमा तिथीच्या प्रदोष काळात देव दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी वाराणसीतील गंगा नदीचे घाट आणि मंदिरे दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतात. हा दिवस देवतांच्या दिवाळीच्या रूपात साजरा केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की देव दिवाळीला नेमकी कोणत्या देवांची पूजा केली जाते? जाणून घेऊयात…

देव दिवाळीला कोणत्या देवाची पूजा केली जाते?

पौराणिक कथांनुसार, कार्तिक पौर्णिमाला सर्व देव-देवता शंकराच्या नगरात गंगा घाटावर येतात. गंगेत स्नान केल्यानंतर शंकराची पूजा करतात आणि दिवे लावतात. त्याशिवाय या दिवशी भगवान विष्णूचीही पूजा करण्यात येते.

देव दिवाळीचे महत्व

धार्मिक मान्यतेनुसार, त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा अत्याचार तिन्ही लोकांमध्ये वाढला होता. देव, देवी आणि मानव सर्वजण दुःखी झाले होते. भगवान शिवाने दैत्य राजा त्रिपुरासुराचा वध करून देवतांना त्याच्या दहशतीतून मुक्त केले. त्या दिवशी, काशीमध्ये गंगेच्या काठावर देव-देवता एकत्र आल्या. त्यांनी गंगेत स्नान केले, प्रदोष काळात भगवान शंकराची पूजा केली आणि दिवे लावले. कार्तिक पौर्णिमेला साजरी होणारी देवांची दिवाळी होती. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला काशी शहरातील गंगेच्या घाटांवर देव दिवाळी साजरी केली जाते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या