दुसऱ्या व्यक्तीची अंगठी घालणे टाळावे कारण प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती आणि त्यांच्याशी संबंधित रत्नांची शक्ती वेगळी असते. दुसऱ्याची अंगठी घातल्यास त्या व्यक्तीच्या ग्रहदोष किंवा राशीच्या वाईट परिणामांचा सामना करावा लागू शकतो, असे ज्योतिषशास्त्र सांगते. जर दुसऱ्याची अंगठी आपल्या बोटात घातली तर त्याचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घेऊयात….
ग्रहांचा प्रभाव
प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहांची स्थिती वेगळी असते. दुसऱ्याची अंगठी वापरल्यास त्या व्यक्तीच्या ग्रहांचा अशुभ प्रभाव तुमच्यावर पडू शकतो, ज्यामुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. रत्न धारण करण्यापूर्वी ज्योतिषीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे, कारण योग्य रत्न योग्य बोटात घातल्यास लाभ होतो आणि चुकीच्या पद्धतीने घातल्यास त्रास होऊ शकतो.

नकारात्मक ऊर्जा
रत्नामध्ये त्या व्यक्तीची ऊर्जा आणि भावना जोडलेल्या असू शकतात. त्यामुळे, दुसऱ्याची अंगठी वापरल्यास त्याच्याकडून येणारी नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू शकते.
अशुभ परिणाम
प्रत्येक बोट विशिष्ट ग्रहाशी संबंधित आहे. चुकीच्या बोटात घातलेली अंगठी त्या व्यक्तीच्या राशीवर किंवा ग्रहांवर नकारात्मक परिणाम करू शकते. अशा चुकांमुळे नशिबावर वाईट परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे जीवनात समस्या येऊ शकतात.
ज्योतिषशास्त्रानुसार नियम
ज्योतिषशास्त्रानुसार, अंगठ्या घालताना विशिष्ट नियम आहेत. चुकीच्या बोटात किंवा चुकीच्या पद्धतीने अंगठी घातल्यास त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)