विवाह पंचमीला श्रीरामाची आणि सीतामातेची पूजा केली जाते, कारण याच दिवशी त्यांचा विवाह झाला होता. या पूजेमुळे वैवाहिक जीवनात आनंद, सौभाग्य आणि प्रेम वाढते असे मानले जाते.
विवाह पंचमीचे महत्त्व
हिंदू धार्मिक पुराणानुसार प्रभू राम आणि माता सीता यांचा विवाह मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी झाला. म्हणून हा दिवस विवाह पंचमी म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. या दिवशी पूजा केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येते. ज्यांचे विवाह जुळत नाहीत किंवा जे इच्छित जीवनसाथी शोधत आहेत, त्यांच्यासाठी या दिवशी केलेली पूजा फलदायी ठरते.

कधी आहे विवाह पंचमी?
मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 24 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजून 22 मिनिटांनी सुरू होईल. आणि दुसऱ्या दिवशी, 25 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजून 56 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार विवाह पंचमी 25 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल.
पूजा पद्धत
धार्मिक ग्रंथांनुसार, या दिवशी पूजा केल्यास अविवाहित लोकांना इच्छित वर मिळतो आणि त्यांच्या विवाह जुळवण्यातील अडथळे दूर होतात.
- सर्वप्रथम आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला आणि नंतर पूजेसाठी जागा तयार करा. मूर्ती किंवा प्रतिमेला पंचामृत आणि शुद्ध पाण्याने स्नान घाला.
- मूर्तीला नवीन वस्त्र अर्पण करा. मूर्तींच्या भोवती सुंदर फुलांची आणि तुळशीची माळ लावा. मूर्तींना कुंकू, हळद, चंदन, अष्टगंध इत्यादी लावा.
- आता धूप आणि दीप प्रज्वलित करा. भगवान राम आणि माता सीतेच्या मंत्रांचा जप करा किंवा त्यांच्या कथा वाचा. रामचरित्रातील विवाह पंचमीच्या प्रसंगाचे पठण करा.
- पूजेच्या शेवटी, नैवेद्य (फळे, मिठाई, किंवा जो काही प्रसाद असेल तो) देवाला अर्पण करा.
- शेवटी, भगवान राम आणि माता सीतेची आरती करा आणि नंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)