हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अधिक महत्त्व आहे. असे मानले जाते की वास्तूच्या नियमांचे पालन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा नेहमी वास करते आणि सुख-समृद्धी टिकून राहते. घरामध्ये रामदरबाराचा फोटो लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते, अशी मान्यता आहे. परंतु घरामध्ये रामदरबाराचा फोटो लावताना वास्तूच्या काही नियमांचे पालन करणे महत्त्वाचे मानले जाते. जाणून घेऊयात..
रामदरबाराचे फोटो लावण्याचे महत्त्व
घरात रामदरबाराचा फोटो लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते, घरात सुख-समृद्धी नांदते आणि नकारात्मकता दूर होते, असे मानले जाते. घरात सकारात्मक वातावरण राहते आणि सुख-शांती टिकून राहते. धन-धान्य आणि समृद्धीचा वास असतो. कुटुंबाचे वाईट शक्तींपासून रक्षण होते आणि आरोग्य चांगले राहते.

दिशा
फोटोची दिशा पूर्व, उत्तर किंवा ईशान्य कोपरा असावी. फोटो नेहमी घराच्या पूर्वेकडील भिंतीवर किंवा उत्तर दिशेला लावावा. ईशान्य कोपरा देखील शुभ असतो. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा, सुख-समृद्धी नांदते आणि कौटुंबिक संबंध सुधारतात, असे वास्तुशास्त्र सांगते. दक्षिण दिशेला रामदरबाराचा फोटो लावू नये, असे वास्तुशास्त्र सांगते.
स्थान
फोटो देवघरात किंवा हॉलमध्ये ठेवावा. बेडरूम, स्वयंपाकघर किंवा बाथरूमच्या समोर लावू नये. फोटोमध्ये प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमानाची मूर्ती योग्य क्रमाने असावी.
स्वच्छता
फोटोची जागा नेहमी स्वच्छ आणि पवित्र असावी.
रामदरबाराची मूर्ती कशी असावी ?
फोटोमध्ये भगवान राम, माता सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमानाचा समावेश असावा. हे सर्वजण एकत्रित बसलेले असावेत. प्रभू श्रीरामांचा चेहरा शांत, तेजस्वी आणि हसरा असावा. त्यांचे रूप प्रसन्न असावे, रौद्र रूप नसावे. फोटोचे रंग तेजस्वी आणि सकारात्मक असावेत.
वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार, रामदरबाराची मूर्ती तुटलेली नसावी. शक्यतो ही मूर्ती पितळ, तांबे किंवा चांदीची असावी. ही मूर्ती दगडाची असल्यास तुटण्याची भीती जास्त असते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











