Astro Tips : आजच्या दिवशी वाचा संकष्टनाशन गणपती स्तोत्र; मिळतील फायदे

हिंदू धर्मात श्रीगणेशाला पूजनीय स्थान आहे. प्रत्येक शुभ कार्यात गणेशाचे पूजन सर्वात आधी केले जाते. मंगळवारी गणपती स्तोत्र वाचणे हा एक चांगला आणि फलदायी उपाय आहे.

मंगळवारी गणपती स्तोत्र वाचणे खूप शुभ मानले जाते, विशेषतः संकष्टनाशन गणपती स्तोत्र किंवा इतर गणपती स्तोत्रे वाचल्याने अडथळे दूर होतात, बुद्धी स्थिर होते आणि मनोकामना पूर्ण होतात, कारण मंगळवार हा गणपतीच्या पूजेसाठी विशेष दिवस मानला जातो.

मंगळवारी गणपती स्तोत्र वाचण्याचे फायदे

जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यास मदत होते. घरात सुख-समृद्धी नांदते आणि शांती प्रस्थापित होते. बुद्धी स्थिर राहते आणि स्मरणशक्तीत वाढ होते. सर्व कार्यांमध्ये यश मिळवण्यासाठी गणपतीची उपासना आवश्यक मानली जाते.

संकष्टनाशन गणपती स्तोत्राचे महत्त्व

या स्तोत्राच्या पठणाने जीवनातील सर्व संकट, दुःख आणि अडथळे दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या स्तोत्राच्या नियमित आणि श्रद्धेने केलेल्या जपामुळे एका वर्षाच्या आत सर्व मनोकामना पूर्ण होतात. गणपतीच्या पूजेच्या वेळी किंवा इतर कोणत्याही दिवशी सकाळी स्नान करून, गणपतीचे स्मरण करून हे स्तोत्र वाचू शकता. 

संकष्टनाशन गणपती स्तोत्र

प्रणम्यं शिरसा देव गौरीपुत्रं विनायकम।
भक्तावासं: स्मरैनित्यंमायु:कामार्थसिद्धये।।1।।
प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं द्वितीयकम।
तृतीयं कृष्णं पिङा्क्षं गजवक्त्रं चतुर्थकम।।2।।
लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकम् ।।3।।
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम।।4।।
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्य य: पठेन्नर:।
न च विघ्नभयं तस्य सर्वासिद्धिकरं प्रभो।।5।।
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्।
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।6।।
जपेद्वगणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत्।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।7।।
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वां य: समर्पयेत।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत:।।8।।
।।इति संकटनाशनस्तोत्रं संपूर्णम्।।
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News