वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील वस्तूंबाबत काही नियम दिले आहेत. त्या वस्तूंबाबत बोलायचं झालं तर स्वयंपाकघरात काही वस्तू वारंवार हातून पडत असतील तर ते शुभ मानले जात नाही शिवाय त्याचे संकेतही चांगले मिळत नाहीत. नक्की यामागील कारणे आणि संकेत काय असू शकतात जाणून घेऊयात….
दूध
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात वारंवार दूध सांडणे अशुभ मानले जाते. हे घरातील वास्तुदोषांचे लक्षण असल्याचेही म्हटले जाते. तसेच घरात वाद विवाद होण्याची शक्यता असते. दूध हे चंद्राचे प्रतीक मानले जाते. दूध वारंवार सांडणे हे आर्थिक संकटाचे लक्षण असू शकते.

मीठ
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात मीठ वारंवार सांडणे हे चांगले लक्षण मानले जात नाही. ते जीवनात येणाऱ्या समस्या दर्शवते. तसेच ते वास्तुदोषाचे देखील संकेत दर्शवते. स्वयंपाकघरात मीठ वारंवार हातून सांडत असेल तर ते खूप अशुभ मानलं जातं. हातातून मीठ पडणे हे धनहानीचे संकेत देते.
मोहरीचे तेल
मोहरीचे तेल किंवा स्वयंपाकघरातील जेवणासाठी वापरले जाणारे कोणतेही तेल वारंवार सांडत असेल तर शनि दोषाचे संकेत असू शकतात. यामुळे आर्थिक नुकसान, आरोग्याच्या समस्या किंवा कौटुंबिक कलह होऊ शकतात. शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची उपासना आणि प्रार्थना करणे हा एक उपाय आहे.
हळद
स्वयंपाकघरात हळद सांडणं हे अपमान, मानहानी किंवा सन्मान कमी होण्याचा अशुभ संकेत मानला जातो. ही गुरू ग्रहाच्या स्थितीचे प्रतीक मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











