भगवान शिवाला अर्पण करा त्यांची आवडती ‘ही’ फुले, तुमच्या मनोकामना होतील पूर्ण

Asavari Khedekar Burumbadkar

हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक देवाची पूजा करण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि नैवेद्य दाखवले जातात. कोणत्या देवतेची पूजा कशी करावी आणि त्यांना कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात हे देखील धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितले आहे. भगवान शंकराला त्यांची आवडती वस्तू अर्पण केली तर प्रत्येक इच्छा पूर्ण होते. इच्छित फळ मिळण्यासाठी भक्तांनी पूजेत शंकराची आवडती फुले अर्पण करावीत. यामुळे अनेक फायदे होतात. भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी काही विशिष्ट फुलांचे महत्त्व आहे. जाणून घेऊया भगवान शिवाचे सर्वात आवडते फूल कोणते आहे?

कणेरचे फूल

कणेरचे फूल शिवासह सर्व देवतांना प्रिय आहे. शिवलिंगावर कणेरचे फूल अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात. कणेरचे फूल अर्पण केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि धन-संपत्तीमध्ये वाढ होते, असे मानले जाते. कणेरचे फूल शिवलिंगावर अर्पण केल्याने शुभ परिणाम मिळतात.

चमेलीचे फूल

भगवान शिवाला चमेलीचे फूल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. चमेलीचे फूल त्यांना आवडते आणि हे फूल अर्पण केल्याने घरात सुख-समृद्धी येते. भगवान शिवाला चमेलीचे फूल सुख प्राप्त करण्यासाठी अर्पण केले जाते.

शमीचे फूल

भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी शमीचे फूल एक खास फूल आहे. शमीचे फूल शिवजीला अत्यंत प्रिय आहे. शमीच्या झाडालाही विशेष महत्त्व आहे आणि हिंदू धर्मात याला पवित्र मानले जाते. शमीचे फूल आणि पाने शिवलिंगावर अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात. शमीचे फूल शिवजीला अर्पण केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते.

नीलकमल

भगवान शिवाला नीलकमल हे फूल खूप आवडते. शिवपुराणातही या फुलाचे महत्त्व सांगितले आहे. नीलकमल हे भगवान शिवाला अर्पण केल्याने हजार शमीच्या पानांचे फळ मिळते.

धतुर्‍याचे फूल

भगवान शिवाला धतुर्‍याचे फूल अतिशय प्रिय आहे. धतूरेचे फूल भगवान शिवाला अर्पण केल्याने त्यांना प्रसन्नता मिळते आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. हे फूल नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींपासून संरक्षण करते.धतूरेचे फूल अर्पण केल्याने घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मकता टिकून राहते. धतूरेचे फूल आणि फळ रोग, बाधा, भय आणि शत्रूंपासून संरक्षण करतात, असे मानले जाते. 

अपराजिताचे फूल

भगवान शिवाला अपराजिताचे फूल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. अपराजिताचे फूल भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे आणि ते त्यांच्या पूजेत वापरले जाते, असे मानले जाते. अपराजिताचं फूल हे खूप पवित्र मानलं जातं, हिंदू धर्मात त्याचे विशेष महत्त्व आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्या