Sankashti Chaturthi 2025 : संकष्टी चतुर्थी? जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

Asavari Khedekar Burumbadkar

संकष्टी चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार, दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत दरवर्षी केले जाते. हे व्रत विघ्न दूर करणाऱ्या गणेशाला समर्पित आहे. या दिवशी श्रीगणेशाची भक्तीभावाने आराधना, प्रार्थना केली जाते.

संकष्टी चतुर्थीचे महत्त्व

संकष्टी चतुर्थी चा उपवास विघ्नहर्ता गणपतीला समर्पित आहे. या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशस्वी भविष्यासाठी प्रार्थना करतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी स्त्रिया निर्जळी उपवास करतात. रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच हा उपवास सोडतात. त्यामुळे संकष्ट चतुर्दशीला चंद्राचे दर्शन आणि पूजा करण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या दिवशी गणपतीच्या पूजेमध्ये तिळाचे लाडू किंवा मिठाई अवश्य ठेवा आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच उपवास सोडा.

पूजा विधी

  • संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
  • दिवसभर उपवास करावा.
  • गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा.
  • अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
  • यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे.
  • प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे.
  • रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा.
  • चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या