आजचा दिवस अत्यंत शुभ आहे, आज शुक्रवार, 10 ऑक्टोबर रोजी संकष्टी चतुर्थी आहे. जिला वक्रतुंड संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. चतुर्थी भगवान गणेश यांना समर्पित आहे. विघ्नहर्त्याची पूजा केल्याशिवाय शुभ कार्य आणि कोणतीही पूजा होऊ शकत नाही. प्रत्येक महिन्यातील दोन चतुर्थी येते. एक शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी. आज प्रत्येक जण सोशल मीडियावर एकमेकांना मेसेजेस पाठवून शुभेच्छा देतात. या खास शुभेच्छा फोटो तुम्हाला नक्कीच कामी येतील….
संकष्टी चतुर्थी तिथी
वैदिक पंचांगानुसार, आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी 9 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजून 54 मिनिटांनी सुरू होईल. या तिथीची समाप्ती 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजून 38 मिनिटांनी होईल. त्यामुळे, उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत 10 ऑक्टोबर रोजी केले जाईल.

संकष्टी चतुर्थी शुभेच्छा 2025
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!
संकष्टी चतुर्थीच्या सर्व गणेशभक्तांना शुभेच्छा!
श्री गणेशाची आराधना केल्याने
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!
संकटांवर मात करणारा
गणपती तुम्हाला यश देवो,
तुमच्या आयुष्यात आनंद आणो आणि दुःख दूर करो..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!
मोदकाप्रमाणे तुमचे जीवन
गोड आणि चंद्रासारखे तेजस्वी व्हावे
हीच संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने
गणपती चरणी प्रार्थना
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!
चंद्रदर्शन आणि बाप्पाचं स्मरण
देईल आपल्याला नवे जीवनाचं कारण
हरू दे चिंता, दूर होवोत त्रास
गणरायाच्या कृपेने मिळो समाधानाचा श्वास
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणराया सर्वांवर कृपा करतो
संकष्ट चतुर्थीचं महत्त्व सांगतो
भक्तीच्या मार्गावर चालू या
विघ्नांचा नाश करू या
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणरायाच्या चरणी ठेवावी प्रार्थना
संकष्ट चतुर्थी देईल सुख-समाधानाची साधना
चंद्रदर्शनाची रात्र आणि बाप्पाचं स्मरण
आजच्या चतुर्थीला मिळो नवं जीवन
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











