Vastu Tips : किचन ओट्यावर चपाती, भाकरी लाटणे शुभ की अशुभ? काय सांगते वास्तूशास्त्र जाणून घ्या…

चपाती किंवा भाकरीशिवाय जेवण अपूर्ण मानलं जातं. अनेक महिला पोलपाट-लाटण्याचा वापर न करता थेट किचन स्लॅबवर किंवा ओट्यावर चपाती लाटतात. पण ही पद्धत योग्य आहे की अयोग्य याबद्दल जाणून घेऊयात...

वास्तूशास्त्रात स्वयंपाक घराबद्दलही काही नियम सांगितले आहेत. शास्त्रानुसार चपाती किंवा भाकरी करण्यासंबंधातही काही नियम सांगितले आहेत. भारतीय घरांमध्ये चपाती किंवा भाकरीशिवाय जेवण अपूर्ण मानलं जातं. पहिली चपाती ही गायीसाठी आणि शेवटची श्वानासाठी केली जाते. आज काल अनेक महिला किचन स्लॅबवर चपाती लाटतात, ही पद्धत योग्य आहे की नाही काय सांगतं शास्त्र याबद्दल जाणून घेऊयात…

किचन स्लॅबवर चपाती लाटणे शुभ की अशुभ?

वास्तूनुसार किचन ओट्यावर चपाती लाटणे अशुभ मानले जाते, कारण ते घरात गरिबी आणि पैशाची कमतरता आणू शकते आणि अन्नपूर्णा देवीचा कोप होऊ शकतो. चपाती लाटण्यासाठी पोळपाट आणि लाटण्याचा वापर करणे शुभ मानले जाते, जे घराच्या सुख-समृद्धीसाठी चांगले असते. स्लॅबवर चपाती लाटल्याने राहु-केतू ग्रहांचा प्रभाव नकारात्मक होऊ शकतो, ज्यामुळे घरात आर्थिक अडचणी आणि इतर समस्या येऊ शकतात. 

पोलपाट-लाटण्याचा वापर करून चपाती लाटणे म्हणजे समृद्धी?

वास्तुशास्त्रानुसार पोलपाट-लाटण्याचा वापर केल्यास घरात सुख-समृद्धी नांदते असे मानले जाते. याउलट, स्लॅबवर लाटणे वापरल्याने समृद्धी कमी होऊन आर्थिक संकटे येऊ शकतात. पोळपाट-लाटणे हे घरामध्ये समृद्धी आणि धन-समृद्धीसाठी शुभ मानले जाते. योग्य वापर केल्यास पोळपाट-लाटणे घरात वास्तुदोष निर्माण होण्यापासून रोखते. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News