Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार ‘या’ सवयींमुळे येते दारिद्रय, आजच स्वतःमध्ये करा बदल

Aiman Jahangir Desai

Chanakya Niti In Marathi:  आचार्य चाणक्यांनी आपल्या ‘नीतिशास्त्र’ या ग्रंथामध्ये जीवनातील विविध गोष्टींबाबत सल्ले दिले आहेत. तसेच सुखी आयुष्य जगण्याचे काही कानमंत्र दिले आहेत. चाणक्य नीतीचा अवलंब केल्यास अनेक अडचणी दूर होतात. आयुष्यात सुखसमृद्धी येते. चाणक्य नितीमध्ये लोकांना आयुष्यात कोणत्या चुका केल्याने सुखसमृद्धी येत नाही आणि माता लक्ष्मी नाराज होते याबाबतही सांगितले आहे.

आजही लोक विविध क्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी चाणक्य नीतीचा वापर करतात. चाणक्य नितीमधील नियमांचा वापर करून कोणत्याही अडचणींमधून बाहेर पडता येते. परंतु चाणक्य नीतीमध्ये अशा काही गोष्टींचा उल्लेख केला आहे ज्या केल्याने दारिद्रय येऊ शकते. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया….

 

महिलांचा अपमान-

आचार्य चाणक्यांच्या मते, ज्या घरात स्त्रियांची स्थिती चांगली नाही. ज्याठिकाणी सतत महिलांचा अपमान केला जातो. त्याठिकाणी माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. त्यामुळे अशा घरांमध्ये दारिद्रय येते. त्यामुळेच कधीच स्त्रियांचा अपमान करू नये. स्त्रियांना नेहमी चांगली वागणूक द्या.

अहंकार आणि इतरांची फसवणूक-
चाणक्य नीतीनुसार, अहंकार माणसाचा शत्रू आहे. अहंकारामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात नुकसान होऊ शकते. तुमच्या अहंकारामुळे लोक तुम्हाला जवळ करत नाहीत. त्यामुळे तुम्ही एकटे पडू शकता. तसेच इतरांची फसवणूक केल्यास कधीच स्वतःला यश मिळत नाही. अशा लोकांना नेहमीच अपयश आणि दारिद्रयाचा सामना करावा लागतो.

अपशब्दांचा वापर-
आचार्य चाणक्यांच्या मते जे लोक सतत इतरांनाबाबत अपशब्दांचा वापर करतात. इतरांना कमी लेखतात अशा लोकांजवळ कधीच माता लक्ष्मी राहात नाही. त्यामुळे हे लोक दारिद्रयाचा सामना करतात.

 

स्वयंपाकघरात खरकटं-

आचार्य चाणक्यांनुसार स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे. स्वयंपाकघर अस्वच्छ असेल तर माता लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे घरात दारिद्रयाचा सामना करावा लागतो. तसेच धनधान्यात कमतरता येते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या