Chanakya Niti In Marathi: एखाद्या व्यक्तीला यशस्वी आणि तत्वज्ञानी बनवण्यासाठी आचार्य चाणक्यांनी अनेक धोरणे तयार केली आहेत. आचार्य चाणक्य हे प्राचीन काळातील एक तत्वज्ञानी, धोरणकर्ते आणि विद्वान होते. त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली आहे. यामध्ये नीतिशास्त्र सर्वात लोकप्रिय ग्रंथ आहे. आचार्य चाणक्यांनी यामध्ये चाणक्य नीती सांगितली आहे.
चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी मनुष्याने समाजात कसे वर्तन करावे, कसे वर्तन करू नये, यश कसे मिळवावे, पैसे कसे कमवावे, प्रगती कशी करावी अशा अनेक लहान-मोठ्या गोष्टींबाबत सल्ले दिले आहेत. यालाच चाणक्य नीती म्हणून ओळखले जाते. असे म्हटले जाते की, चाणक्य नीतीचा वापर केल्यास कधीही अपयश येत नाही. आजही अनेक लोक आपल्या अडचणी दूर करण्यासाठी चाणक्य नीतीचा वापर करतात. त्यामुळेच आज आपण चाणक्य नितीमध्ये सांगितलेल्या अशा गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे मनुष्याची प्रगती होत नाही…..

आळस-
चाणक्य नीतीनुसार जर तुम्हाला प्रगतशील आणि समृद्ध आयुष्य जगायचे असेल तर सर्वात आधी आळस सोडला पाहिजे. कारण आळसामुळे प्रत्येक क्षेत्रातील चांगल्या संधी हातातून निसटतात. आळसामुळे अनेक कार्ये रखडतात. तसेच तुमची प्रगती होण्यास अडथळे निर्माण होतात.
गर्विष्ठपणा-
चाणक्य नीतीनुसार, मनुष्याला कधीही कोणत्या गोष्टीचा गर्व असू नये. गर्विष्ठपणामुळे अनेक लोक तुमच्या संपर्कातून बाहेर होतात. तुम्हाला करण्याचा प्रयत्न करत नाहीत. गर्वामुळे तुमच्या हातातून चांगल्या संधी निघून जातात. त्यामुळे तुमची प्रगतीही होत नाही. त्यामुळे मनुष्याने कधीही गर्विष्ठपणा करू नये.
लालसा-
चाणक्य नीतीनुसार, माणसाने कधीही अति लालच करू नये. लालसा केल्याने हातात काहीच राहात नाही. लालसेमुळे अनेकदा सगळ्याच संधी हातातून निसटतात. त्यामुळे लालसा करणे टाळा.
असत्य-
चाणक्य नीतीनुसार, असत्य बोलणे टाळा. कारण असत्य बोलल्यास तुम्हाला अनेक गोष्टींना मुकावे लागते. असत्यामुळे कधीही तुम्हाला चांगल्या संधी प्राप्त होत नाहीत. याउलट तुमची प्रतिमा खराब होते. तुम्ही इतरांच्या नजरेतून उतरता. त्यामुळे यश मिळवण्यासाठी कधीही असत्य बोलू नका.
दिखाऊपणा-
चाणक्य नीतीनुसार, ज्या व्यक्ती फक्त आणि फक्त दिखावा करतात त्यांची कधीही प्रगती होत नाही. अशा व्यक्ती आपला पैसा आणि वेळ दिखाऊपणामध्येच खर्च करतात. त्यामुळे चांगल्या संधी त्यांच्यापासून निसटतात. अशा व्यक्ती कधीही प्रगती करू शकत नाहीत.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)