MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

Chanakya Niti For Husband Wife : बायकोपासून लपवा या 4 गोष्टी, अन्यथा सगळं संपलं समजा

Published:
Last Updated:
नवरा बायकोचा संसार सुखा समाधानाने चालण्यासाठी नवऱ्याला काही गोष्टी ह्या बायकोपासून लपवणे गरजेचे असते... अन्यथा बायको तुमचा गैरफायदा घेईल असं आचार्य चाणक्य यांना वाटते...
Chanakya Niti For Husband Wife : बायकोपासून लपवा या 4 गोष्टी,  अन्यथा सगळं संपलं समजा

आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान रणनीतीकार आणि धोरणकर्ते मानले जातात. जीवनात यश मिळविण्यासाठी, आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करणे हा सर्वोत्तम मार्ग असल्याचे म्हटले जाते. आयुष्यात यशस्वी कसं व्हायचं? लक्ष्मीची कृपा आपल्यावर ठेवण्यासाठी काय करायचं?? नाती कशी जपायची?? शत्रूला कसं ओळखायचं? याबाबत आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीती चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केला आहे…. चाणक्य नीति तून आचार्य चाणक्य यांनी पती-पत्नीच्या नात्याबद्दल (Chanakya Niti For Husband Wife) ही भाष्य केलं आहे… नवरा बायकोचा संसार सुखा समाधानाने चालण्यासाठी नवऱ्याला काही गोष्टी ह्या बायकोपासून लपवणे गरजेचे असते… अन्यथा बायको तुमचा गैरफायदा घेईल असं आचार्य चाणक्य यांना वाटते….

1) तुमची कमजोरी –

कोणत्याही नवऱ्याने आपल्या कमजोरी बद्दल बायकोला सांगू नये. परिस्थिती किती ही भावनिक झाली तरी नवऱ्याने बायकोला त्याच्या कमकुवतपणाबद्दल व्यक्त होऊ नये. कारण बऱ्याच वेळा पत्नी पतीच्या कमकुवतपणाचा गैरफायदा घेऊन तिचे काम पूर्ण करू शकते… आणि समाजात तुम्हाला अपमान सहन करावा लागू शकतो.

2) तुमची कमाई – Chanakya Niti For Husband Wife

चाणक्य नीतिनुसार, पतीने आपल्या उत्पन्नाबद्दल सर्व काही आपल्या पत्नीला सांगू नये. जर समजा तुमचे उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही पत्नीला खर्च करण्यापासून रोखू शकत नाही अशांनी अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता असते… अशावेळी जर समजा चुकून तुमच्यावर कोणता आघात झाला तर त्यावेळी तुम्हाला पैशाची कमतरता भासू शकते. म्हणून तुमचा महिन्याचा पगार किती आहे?? तुम्ही किती रुपये कमवता ??याची अचूक आकडेवारी बायको पासून लपवून ठेवावी. Chanakya Niti For Husband Wife

3) गुप्त दान –

आयुष्यात दानधर्म करणे हे खूप महान कार्य मानले जाते… परंतु असेही म्हटले जाते की जर आपण एका हाताने दान करू तर ते दुसऱ्या हाताला सुद्धा कळायला नको… कारण दान हे एक पुण्यकर्म आहे. प्रत्येक व्यक्ती त्याच्या शक्तीनुसार दान करतो. अशा परिस्थितीत, आचार्य चाणक्य यांनी पत्नीपासूनही दानाविषयीची माहिती लपवण्याचा सल्ला दिला आहे. कारण पत्नीला दानधर्म केल्याबद्दल सांगितल्याने त्याचे महत्त्वही संपल्यात जमा होते.

4) तुमचा अपमान –

जर कुठे तुमचा अपमान झाला तर त्या अपमानाबद्दलची तुमच्या तुमच्या पत्नीसमोर करू नका. कारण कोणती पत्नी आपल्या पतीचा अपमान सहन करू शकत नाही. अशावेळी ज्या व्यक्तीने तुमचा अपमान केलाय त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न पत्नीकडून होऊ शकतो . अशाने भांडण तंटा वाढण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे तुमच्या अपमानाबद्दल पत्नीला न सांगितलेलं बरं…

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)