Fri, Dec 26, 2025

Chanakya Niti: आचार्य चाणक्यांच्या मते ‘या’ गोष्टींमध्ये कधीच लाज बाळगू नका, नाहीतर होईल नुकसान

Published:
चाणक्य नीतीमधून आचार्य चाणक्यांनी लोकांना अनेक धोरणे, नियम आणि सल्ले दिले आहेत.
Chanakya Niti: आचार्य चाणक्यांच्या मते ‘या’ गोष्टींमध्ये कधीच लाज बाळगू नका, नाहीतर होईल नुकसान

What should not be ashamed of according to Chanakya Niti:   आचार्य चाणक्य हे प्राचीन काळातील एक विद्वान, रणनीतिकार आणि धोरणकर्ता होते. त्यांनी त्याकाळात अनेक ग्रंथ लिहिले आहेत. यामध्ये त्यांनी विविध गोष्टींबाबत लिखाण केले आहे. यामध्ये चाणक्य नीती सर्वात जास्त लोकप्रिय आहे. लोक आजही चाणक्य नीतीचा अवलंब करतात. दैनंदिन जीवनामध्ये चाणक्य नीती मदत करते.

चाणक्य नीतीमधून आचार्य चाणक्यांनी अनेक धोरणे, नियम आणि सल्ले दिले आहेत. यामध्ये त्यांनी लोकांना यश कसे मिळवायचे, कोणत्या परिस्थितीत कसे वर्तन करायचे, आर्थिक परिस्थितीत सुधारण्यासाठी काय करायचे यापासून ते अनेक लहान-मोठ्या अशा प्रत्येक गोष्टींबाबत नियम सांगितले आहेत. त्याचा अवलंब केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होतो. आज आपण कोणत्या गोष्टींमध्ये लाज बाळगायची नाही याबाबतची चाणक्य नीती पाहणार आहोत….

 

पैसे कमविण्यात-

आचार्य चाणक्यांच्या मते योग्य मार्गाने कष्टाने धन कमविण्यात लोकांनी कधीही लाजू नये. कारण याबाबतीत लाज बाळगल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान तर होतेच शिवाय तुमची परिस्थितीही सुधारत नाही. पैसे कमविण्यासाठी कोणतेही लहान-मोठे काम करताना लोकांचा विचार करू नये. अशाने तुम्हाला दारिद्रयाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नेहमीच कष्टाने आणि जिद्दीने पैसे कमवा.

 

शिक्षण घेण्यात-

चाणक्य नीतीनुसार, माणसाचे नशीब बदलणारी गोष्ट म्हणजे शिक्षण होय. शिक्षणाच्या जोरावर माणूस काहीही साध्य करू शकतो. त्यामुळे शिक्षण घेताना कधीही लाज बाळगू नये. शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे कोणाकडूनही शिक्षण घेण्यास अजिबात लाज बाळगू नये.

 

भूक लागल्यास-

आचार्य चाणक्यांच्या मते व्यक्तीला भूक लागणे ही नैसर्गिक आणि स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्यामुळे भूक लागल्यास कोणतीही लाज न बाळगता अन्न सेवन करा. मग कोणत्याही ठिकाणी जेवण्यास लाजू नये. जर तुम्ही लोकांचा विचार करून लाजत राहिला तर तुम्ही उपाशीच राहाल. त्यामुळे जेवणाच्या बाबतीत कधीही लाजू नका.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)