आचार्य चाणक्य हे एक महान तत्त्वज्ञ, कायदेतज्ज्ञ, राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ होते, ज्यांचे मूळ नाव विष्णूगुप्त होते. त्यांनी आपल्या चाणक्यनिती (Chanakya Niti) या ग्रंथात अनेक मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत. मनुष्याने जीवन कसे जगावे?? आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करावे? आर्थिकदृष्ट्या श्रीमंत होण्यासाठी नेमकं काय करावे याबाबत अनेक सल्ले दिले आहेत. आचार्य चाणक्य यांच्या मते, काही विशिष्ट लोकांना कधीही पैसे उधार देऊ नये, मग ते तुमच्या कितीही जवळचे असले तरी.
या लोकांना कधीही पैसे उधार देऊ नका.
चाणक्य नीति नुसार, तुम्ही कधीही मूर्ख व्यक्तीला पैसे उधार देऊ नका, कारण अशा व्यक्तीला पैशाचा योग्य वापर कसा करायचा हे माहित नसते आणि तुम्ही दिलेला पैसा तो चुकीच्या मार्गाने खर्च करू शकतो.

कदर नसलेल्या लोकांना – Chanakya Niti
आचार्य चाणक्य यांच्या मते, तुम्ही कधीही अशा व्यक्तीला पैसे उधार देऊ नये जो पैशाची कदर करत नाही, कारण हे लोक तुमचे पैसे वाया घालवू शकतात. आणि तुम्हाला तुमचे पैसे परत मिळण्याची अजिबात शक्यता असते. म्हणून, चाणक्य नीति नुसार अशा लोकांना पैसे उधार देण्याचे टाळावे.
वाईट सवयी असलेली माणसे
आचार्य चाणक्य म्हणतात की एखादी व्यक्ती तुमच्यासाठी कितीही खास असली तरी, जर त्यांना वाईट सवयी असतील किंवा ड्रग्जचे व्यसन असेल, तर तुम्ही त्यांना कधीही पैसे उधार देऊ नये. कारण अशा व्यक्तीकडून तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यताच नाही तर ते त्या पैशाचा वापर त्यांच्या व्यसनासाठी आणि हौसमौज साठी करू शकतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)