भारतीय इतिहासाचे महान विद्वान आचार्य चाणक्यांनी चाणक्य नितीमध्ये (Chanakya Niti) मनुष्याच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीवर मात करण्याचे अचूक उपाय सांगण्यात आले आहेत. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी माणसाने काय करावं? कशाप्रकारे काम करावं याबाबत चाणक्यांनी मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत. आचार्य चाणक्य म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीला यश मिळवायचे असेल तर त्याने कधीही दोन गोष्टींना घाबरू नये. पहिली गोष्ट म्हणजे बदल आणि दुसरी गोष्ट म्हणजे संघर्ष…. कारण या 2 गोष्टी प्रगतीच्या सर्वात मोठ्या पायऱ्या आहेत.
1) बदल
बदल हा जीवनाचा नियमच आहे. जग नेहमीच बदलत असते नवीन बदलानुसार आपल्यालाही त्यानुसारच राहावे लागते. त्या बदलाला स्वीकारावे लागतं. चाणक्य म्हणतात की वेळ आणि परिस्थिती कधीही सारखी राहत नाही. ज्यांना बदलाची भीती वाटते ते मागे राहतात. बदल स्वीकारायला शिकले पाहिजे, कारण तो जीवनात नवीन गोष्टी आणत असतो. आपण जर स्वतःमध्ये बदल केले तरच यशस्वी होऊ शकतो असे आचार्य चाणक्यांनी सांगितलं आहे. उदाहरणार्थ समजा वर्षानुवर्षे तुम्ही एकच काम करताय आणि कधी कधी तुम्हाला वेगळेच काहीतरी काम सांगण्यात आलं, तर तुम्ही ते स्वीकारलं पाहिजे. मला ते काम जमेल का?? मग कसं होईल?? असा विचार कधीही करू नये?? असे विचार करणारे लोक आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत.

2) संघर्ष
संघर्ष ही यशाची गुरुकिल्ली आहे. संघर्षापासून पळून जाणारा माणूस कधीही बलवान होऊ शकत नाही. जीवनात संयम, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास किती महत्त्वाचा आहे हे अडचणी आपल्याला शिकवतात. चाणक्य यांच्या मते, संघर्ष माणसाचे चारित्र्य घडवतो आणि त्यांना यशाकडे घेऊन जातो. अशावेळी परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी माणसाने संघर्ष केला पाहिजे, परिस्थितीशी दोन हात करून लढलं पाहिजे. जी व्यक्ती संघर्ष करायला घाबरते आणि पळ काढते अशी व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही असं आचार्य चाणक्यांना वाटतं. एकूणच काय तर चाणक्य नीतिचा हा संदेश आपल्याला बदलांना आणि संघर्षांना घाबरू नका, तर त्यांना स्वीकारून जीवनात पुढे जाण्यास शिकवतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)