Chanakya Niti : या 3 व्यक्ती कायमच गरीब राहतात; पहा काय सांगते चाणक्य नीति

Asavari Khedekar Burumbadkar

आचार्य चाणक्यांनी (Chanakya Niti) आपल्या ‘नीतिशास्त्र’ या ग्रंथामध्ये जीवनातील विविध गोष्टींबाबत सल्ले दिले आहेत. तसेच सुखी आयुष्य जगण्याचे काही कानमंत्र दिले आहेत. माणसाने आयुष्यात कसं जगायचं?? यशस्वी होण्यासाठी काय करायचे?? याबाबतच्या चाणक्यांनी अनेक मार्गदर्शक तत्त्वे सांगितले आहेत. या तत्त्वांचे पालन केल्यास मनुष्याचे आयुष्य सुख समृद्धीने भरते असे म्हटले जाते. तुमच्या आसपास असे अनेकजण असतील जे खूप कष्ट करतात परंतु त्यांच्या हातात पैसा मात्र टिकत नसेल.  यामागची कारणे काय असू शकतात हे सुद्धा आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीति मध्ये सांगितली आहेत.

आचार्य चाणाक्य यांनी आपल्या चाणक्य नीती मध्ये माणसांच्या काही चांगल्या स्वभावाची आणि सवयींची उदाहरणं दिली होती ज्यामुळे किती कष्ट आणि मेहनत घेतली तरी त्या व्यक्तीच्या हातात पैसा टिकत नाही. दिवसेंदिवस तो गरीबच होत जातो. या  या सवयी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

इतरांवर अवलंबून असणं – Chanakya Niti

चाणाक्यांच्या म्हणण्यांनुसार, जो व्यक्ती दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःची कामे करण्याचा प्रयत्न करतो तो आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. कारण या व्यक्ती आत्मनिर्भर नसतात त्यामुळे हे लोक आयुष्यात कधीच धनवान होऊ शकत नाहीत. अशा लोकांना आयुष्यभर संघर्ष आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. याप्रमाणेच जो व्यक्ती स्वतःची कामे दुसऱ्यांना सांगतो, त्या व्यक्तीला त्या कामाची कधीच गंभीरता नसते असे लोकही आयुष्यात मोठा तीर मारू शकत नाहीत.

वाणीत कटुता 

चाणक्य नीति नुसार ज्या व्यक्तीच्या वाणीतच कटूत आहे ती व्यक्ती आयुष्यात पैसा कमवू शकत नाही. तोंडाची भाषा चांगली नसेल तर आपण जास्त माणसे जोडू शकत नाही. तसेच तोंडाची घाण केल्याने लक्ष्मी अशा लोकांवर नाराज होण्याची शक्यता असते.साहजिकच ती त्यांच्यापासून दूर राहते, परिणामी या व्यक्तींना आयुष्यभर गरिबीचा सामना करावा लागतो.  ज्यांची वाणी कठोर आणि कटू असते त्यांचं भाग्य देखील तितकंच कमजोर असतं. यासाठीच वाणीत गोडवा असावा. मित्र-मैत्रीणींशी सलोख्याने वागावं. यामुळे जीवनात तुमची प्रगती दिसून येईल. (Chanakya Niti)

आळशी लोक 

आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे असं म्हटलं जातं. मात्र तरी आजकाल अनेक जण प्रत्येक कामात आळस आणि कंटाळा करतात.  चाणक्य नीति नुसार अशा लोकांपासून पैसा दिवसेंदिवस दूर जातो आणि त्यांना गरीब परिस्थितीत राहावं लागतं.  जे लोक आजचं काम उद्यावर ढकलतात त्यांची आयुष्यात कधीच प्रगती होत नाही. आळस हा व्यक्तीची क्षमता आणि वेळ नष्ट करुन टाकतो. परिणामी, अशा लोकांना आयुष्यात आर्थिक संकटातून बाहेर येण्यास खूप त्रास होतो. यासाठी आजपासूनच आळसावर मात करण्याचा प्रयत्न करा.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या