७ सप्टेंबर रोजी म्हणजेच उद्या भारतात वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण ( Chandra Grahan 2025) होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे देशातील सर्व राज्यांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे. चंद्रग्रहण ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषांच्या दृष्टिकोनातूनही ती महत्त्वाची मानली जाते. भरीस भर म्हणजे उद्यापासूनच पितृपक्ष सुरू होत आहे. त्यामुळे तब्बल 100 वर्षांनी चंद्रग्रहण आणि पितृपक्ष यांचा योगायोग पाहायला मिळतोय. उद्याच्या चंद्रग्रहणाचा सुतक काळ कधी सुरू होईल?? आणि ते किती वाजेपर्यंत पाहायला मिळेल याबाबतची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
चंद्रग्रहण कधी होते? Chandra Grahan 2025
असे मानले जाते की, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा सूर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. या घटनेला चंद्रग्रहण म्हणतात. उद्याचे चंद्रग्रहण हे या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण रात्री ९:५८ वाजता सुरू होईल आणि रात्री उशिरा १:२६ वाजता संपेल.
सुतक काळ कधी आहे??
ज्योतिषांच्या मते, चंद्रग्रहण सुरू होण्याच्या सुमारे ९ तास आधी सुतक काळ सुरू होतो. त्यामुळे ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२:५९ वाजता सुतक काळ सुरू होईल. (Chandra Grahan 2025)
सुतक काळात या गोष्टी करू नये
शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की सुतक काळाच्या दरम्यान अन्न आणि धान्य सोडले पाहिजे. कोणत्याही प्रकारचे नकारात्मक काम करणे निषिद्ध मानले जाते. या काळात आध्यात्मिक चिंतन, ध्यान, रामचरितमानस पठण आणि शिव मंत्रांचा जप करावा. याशिवाय ग्रहण दरम्यान उरलेल्या अन्नात तुळशीची पाने टाकावीत.
कोण कोणत्या देशात चंद्रग्रहण दिसणार ?
उद्याचे चंद्रग्रहण भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आफ्रिका, आशिया, युरोप, पश्चिम आणि उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागात देखील दिसेल.





