आपला भारत देश असा आहे जिथे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रथा परंपरा पहायला मिळतात. वेगवेगळ्या संस्कृतीच्या अनोख्या परंपरा सर्वत्र आढळतात. देवदेवतांच्या पूजा करण्याच्या पद्धतीही वेगळ्या आहेत….. आज आम्ही तुम्हाला अशीच एक अजब गोष्ट सांगणार आहे.. मित्रांनो आपल्या भारतात असेही एक मंदिर आहे (Chinese Kali Temple) जिथे दुर्गा मातेला चक्क मोमोज आणि नूडल्सचा प्रसाद दाखवला जातो. वाचून आश्चर्य वाटतंय ना पण खरं आहे…
आम्ही तुम्हाला ज्या मंदिरातून सांगतोय त्या मंदिराचं नाव आहे “चिनी काली मंदिर”…. या ठिकाणी पारंपारिक नैवेद्यांऐवजी देवीला मोमोज, नूडल्स आणि इतर चिनी पदार्थ प्रसाद म्हणून दाखवले जातात. हे मंदिर केवळ त्याच्या अनोख्या नैवेद्य परंपरेसाठी प्रसिद्ध नाही तर भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे आणि सुसंवादाचे एक उत्तम उदाहरण म्हणून देखील काम करते.
चिनी काली मंदिर कुठे आहे? Chinese Kali Temple
चिनी काली मातेचे हे मंदिर (Chinese Kali Temple) पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील टांग्रा येथे आहे. स्थानिक लोक त्याला चायनाटाउन असेही म्हणतात. चीनमधील गृहयुद्धादरम्यान, अनेक चिनी निर्वासित कोलकाता येथे स्थायिक झाले आणि त्यांची संस्कृती आणि परंपरा त्यांच्यासोबत घेऊन आले.
चिनी काली मंदिराची कहाणी
मंदिराच्या विचित्र नावामागे सुद्धा एक कथा आहे…असे म्हटले जाते की ६० वर्षांपूर्वी, या शहरात एक चिनी कुटुंब राहत होते. एके दिवशी, कुटुंबातील एक मूल गंभीर आजारी पडले. अनेक उपचारांनंतरही, मुलाची तब्येत सुधारली नाही. शेवटी, कुटुंब मुलाला कालीच्या देवीच्या मंदिरात घेऊन गेले. आणि चमत्कारी रित्या बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. ही बातमी संपूर्ण चिनी समुदायात वेगाने पसरली आणि चिनी समुदायाने या मंदिराचे नूतनीकरण केले आणि नियमित पूजा सुरू केली. हळूहळू, मोठ्या संख्येने चिनी लोक मंदिरात येऊ लागले. तेव्हापासून, मंदिर चिनी काली माता म्हणून ओळखले जाऊ लागले.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





