कपाळावर विभूती लावलेले अनेक लोक तुम्ही बघितले असतील. खास करून दक्षिण भारतीय लोक विभूतीचे आध्यात्मिक आणि संस्कृतीचे महत्व स्पष्ट करतात. भारताचा सर्वात तरुण बुद्धिबळ ग्रँडमास्टर डी गुकेश हा सुद्धा जेव्हा पहिल्यांदा चॅम्पियन बनला होता, तेव्हा त्याच्या कपाळावर असलेल्या विभूतीची सुद्धा सर्वत्र चर्चा झाली होती. एका मुलाखतीत याबाबत सांगताना गुकेश म्हणाला होता की, लहानपणी त्याच्या आईने त्याच्या कपाळावर विभूती (D Gukesh On Vibhuti) लावली होती. ती एक धार्मिक परंपरा असून आजही तो या परंपरेचे पालन करतो. विभूतीमुळे आपली एकाग्रता सुद्धा सुधारते असे त्यावेळी गुकेशने सांगितले होते. परंतु मित्रांनो विभूतीचे आणखी फायदे तुम्हाला माहिती आहेत का? चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगतो.
विभूतीचे महत्त्व

धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा
कपाळावर विभूती किंवा चंदनाची पेस्ट लावणे ही अनेक भारतीय कुटुंबांमध्ये, विशेषतः प्रार्थनेनंतर एक सामान्य परंपरा आहे. खास करून दक्षिण भारतीय लोकांमध्ये तुम्हाला ही गोष्ट प्रकर्षाने दिसेल.
एकाग्रता सुधारते – D Gukesh On Vibhuti
काही लोकांचा असा विश्वास आहे की विभूती लावल्याने एकाग्रता वाढते, जी बुद्धिबळसारख्या मानसिक खेळासाठी महत्त्वाची आहे.
अध्यात्मिक आणि शारीरिक फायदे
विभूती कपाळावर लावल्याने अनेक आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक फायदे होतात. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते, मन शांत राहते, एकाग्रता वाढते, आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, असे मानले जाते. विभूती मुळे वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते, असेही म्हणतात. (D Gukesh On Vibhuti)
शंकराची कृपा कपाळावरील विभूती हे भगवान शंकराचे प्रतीक मानले जाते. अशावेळी विभूती लावणाऱ्या भक्तांवर भगवान शंकराची विशेष कृपा असते. या लोकांना नेहमीच शंकराचे आशीर्वाद लागतात आणि त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात असे म्हटले जाते.
शारीरिक फायदे
कपाळावर विभोवती लावण्याचे काही शारीरिक फायदे सुद्धा आहेत .असं म्हटलं जातं की, विभूती लावल्याने मन शांत आणि स्थिर राहते, कपाळाला थंडावा मिळतो तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











