Dhanteras 2025 : धनतेरसला या वस्तू खरेदी करू नका, अन्यथा तुम्हीही व्हाल गरीब

Asavari Khedekar Burumbadkar

दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय सण… धनतेरस च्या (Dhanteras 2025) दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते..दरवर्षी कार्तिक महिन्याच्या काळ्या पंधरवड्याच्या तेराव्या दिवशी धनतेरस साजरा केला जातो. यावर्षी १८ ऑक्टोबर धनतेरस आहे. या दिवशी भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की या शुभ दिवशी (धनतेरस २०२५ उपय) सोने, चांदी आणि भांडी खरेदी केल्याने संपत्ती १३ पट वाढते. परंतु धनतेरसच्या दिवशी काही वस्तूंची खरेदी करणेही टाळले पाहिजे अन्यथा तुमच्या घरात गरिबी येऊ शकते. या वस्तू कोणत्या आहेत तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तू

धनतेरसला चाकू, कात्री, पिन किंवा कोणतीही तीक्ष्ण वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते. अशा प्रकारच्या तीक्ष्ण लोखंडी वस्तू खरेदी केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. लक्ष्मी माता तुमच्यावर रागवू शकते. त्यामुळे तुम्हाला जर अशा प्रकारची कोणती वस्तू खरेदी करायची असेल तर ती धनतेरसच्या दिवशी न करता त्याच्या आदल्या दिवशी केली तर चालेल.

चामड्याच्या वस्तू Dhanteras 2025

धनतेरस च्या शुभ दिवशी  चामड्याच्या वस्तू खरेदी करू नका. त्या अशुद्ध मानल्या जातात. तांब्याचे चप्पल चामड्याचा पट्टा अशा प्रकारच्या वस्तू खरेदी करणे टाळावे कारण त्या खरेदी केल्याने घरात गरिबी येऊ शकते तसेच नको त्या मार्गाला पैसे खर्च होऊ शकतात.

प्लास्टिक आणि काचेच्या वस्तू

काही लोक धनतेरसला प्लास्टिकचे बॉक्स किंवा सजावटीच्या वस्तू खरेदी करतात. ज्योतिषशास्त्रात प्लास्टिकला चिरस्थायी संपत्तीचे प्रतीक मानले जात नाही, म्हणून ते धनतेरसला खरेदी करू नये. त्याचप्रमाणे काचेचा संबंध राहू ग्रहाशी आहे, म्हणून काचेच्या वस्तू खरेदी केल्याने अशुभ परिणाम देखील मिळू शकतात.

काळ्या वस्तू

धनतेरस (Dhanteras 2025) आणि दिवाळीचे सण प्रकाश आणि शुभतेचे प्रतीक आहेत. म्हणून, या दिवशी काळ्या वस्तू, विशेषतः कपडे, वाहने किंवा सजावटीच्या वस्तू खरेदी करणे टाळा. यामुळे घरात नकारात्मकता वाढू शकते.

अशुद्ध धातू

या दिवशी बनावट किंवा भेसळयुक्त सोने, पितळ किंवा इतर धातू खरेदी करू नका. जर तुम्हाला महागडे धातू परवडत नसतील तर तुम्ही मातीचे दिवे, धणे किंवा झाडू खरेदी करू शकता, जे अत्यंत शुभ मानले जातात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या