Dhantrayodashi 2025 : धनत्रयोदशीला घरी आणा या झाडाचे रोप; धनलाभासाठी बेस्ट पर्याय

Asavari Khedekar Burumbadkar

उद्या 18 ऑक्टोंबर ला धनत्रयोदशी (Dhantrayodashi 2025) साजरी केली जाईल. धनत्रयोदिवशी भगवान धन्वंतरी लक्ष्मी माता आणि कुबेर यांची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की या देवतांच्या पूजेमुळे घरात आर्थिक सुख-समृद्धी आणि शांती नांदते. आर्थिक भरभराटीसाठी अनेक जण धनत्रयोदशी दिवशी सोने-चांदीची खरेदी करतात. परंतु अनेकांना आर्थिक परिस्थितीमुळे सोने-चांदीची खरेदी शक्य होत नाही. अशावेळी आज आम्ही तुम्हाला एका वनस्पतीच्या रोपा बद्दल सांगणार आहोत जे धनत्रयोच्या शुभ मुहूर्ती घरी आणल्यास पैशाच्या संदर्भातील तुमच्या सर्व चिंता मिटू शकतात.

काय आहे वनस्पतीचे नाव ? Dhantrayodashi 2025

आम्ही तुम्हाला ज्या वनस्पती बद्दल सांगत आहोत त्या वनस्पतीचे नाव आहे क्रॅसुला…. असे म्हटले जाते की घरात ही वनस्पती लावल्याने भगवान कुबेराचा आशीर्वाद मिळतो आणि संपत्ती आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होतो. महत्त्वाचे बाब म्हणजे या वनस्पतीची देखभाल करणेही अतिशय सोप्प आहे. क्रॅसुला वनस्पती वास्तुशास्त्रामध्ये एक अतिशय चमत्कारिक वनस्पती मानली जाते. ही वनस्पती घरात लावल्याबरोबर सकारात्मक ऊर्जा आणि पैसा दोन्ही घराकडे आकर्षित होतात. या वनस्पतीला संपत्तीचे प्रतीक मानले जाते.

कोणत्या दिशेला लावावी क्रॅसुला वनस्पती

वास्तुशास्त्रानुसार, क्रॅसुला वनस्पती घराच्या उत्तर दिशेला ठेवणे शुभ असते. कारण उत्तर दिशा ही भगवान कुबेराची प्रतीक मानली जाते. त्यामुळे जेव्हा ही वनस्पती उत्तरेकडे ठेवली जाते तेव्हा ती घरात संपत्तीचा प्रवाह वाढवते. जर उत्तर दिशेला क्रॅसुला वनस्पती ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही नैऋत्य दिशेला ही वनस्पती ठेवू शकता. जेव्हा घरात क्रॅसुला वनस्पती ठेवली जाते तेव्हा ती केवळ भगवान कुबेराचाच आशीर्वाद देत नाही तर संपत्तीची देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद देते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या