MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

Dhantrayodashi 2025 : धनत्रयोदशीला सोनं खरेदी करताय? पहा शुभ मुहूर्त किती वाजता आहे?

असे म्हणतात की धनत्रयोदशीला खरेदी केल्यास तुमच्या संपत्तीत 13 पटीने वाढ होते.  या दिवशी झाडू, सोने, वाहने, भांडी इत्यादी वस्तू खरेदी केल्याने जीवनात नवीन बदल होतात आणि समृद्धी येते.
Dhantrayodashi 2025 : धनत्रयोदशीला सोनं खरेदी करताय? पहा शुभ मुहूर्त किती वाजता आहे?

दिवाळी म्हटलं की खरेदी ही आलीच… दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आणि खास करून धनत्रयोदशीला (Dhantrayodashi 2025) अनेक जण सोने आणि चांदी खरेदी करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदीची खरेदी अत्यंत शुभ मानली जाते आणि त्याचा प्रभाव लक्ष्मी मातेवर पडतो. यांचा 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी केली जाईल. शास्त्रांनुसार धनत्रयोदशी च्या दिवशी भगवान धन्वंतरी लक्ष्मी माता आणि कुबेर यांची पूजा केली जाते. असे म्हणतात की धनत्रयोदशीला खरेदी केल्यास तुमच्या संपत्तीत 13 पटीने वाढ होते.  या दिवशी झाडू, सोने, वाहने, भांडी इत्यादी वस्तू खरेदी केल्याने जीवनात नवीन बदल होतात आणि समृद्धी येते. तुम्हीही धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कोणत्या शुभ मुहूर्तावर ही खरेदी करावी हे पाहणेही तितकच गरजेचं आहे.

काय आहे शुभ मुहूर्त? Dhantrayodashi 2025

यावर्षी धनत्रयोदशी 18 ऑक्टोंबर ला साजरी केली जाईल. ज्योतिषांच्या मते, धनत्रयोदशीला (Dhantrayodashi 2025) सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी शुभ वेळ सकाळी ८:५० ते १०:३३ पर्यंत असेल. दुसरी शुभ वेळ सकाळी ११:४३ ते दुपारी १२:२८ पर्यंत आहे. आणि तिसरी शुभ वेळ संध्याकाळी ७:१६ ते रात्री ८:२० पर्यंत आहे.

धनत्रयोदशीच्या पूजेचा मुहूर्त

धनत्रयोदशीच्या पूजेसाठी शुभ वेळ संध्याकाळी ७:१६ ते रात्री ८:२० पर्यंत असेल. या काळात, देवी लक्ष्मी, कुबेर महाराज आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा करणे फायदेशीर ठरू शकते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)