Dhantrayodashi 2025 : धनत्रयोदशीला काय करावे आणि काय करू नये? एकदा वाचाच

धनत्रयोदशीपासून या आपल्या आवडत्या सणाला सुरुवात होते. यंदा 18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाईल. हा दिवस भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या पूजेसाठी समर्पित असतो.

यंदाची दिवाळी 20 ऑक्टोबरला असून सर्वत्र दिवाळीच्या तयारीची लगबग पाहायला मिळत आहे. धनत्रयोदशीपासून (Dhantrayodashi 2025) या आपल्या आवडत्या सणाला सुरुवात होते. यंदा 18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाईल. हा दिवस भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या पूजेसाठी समर्पित असतो. शास्त्रांनुसार, या दिवशी काही नियमांचे पालन केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते. परंतु या दिवशी काही गोष्टी टाळणेही तितकेच गरजेचे आहे. आज आपण जाणून घेऊया धनत्रयोदशीला काय करावे आणि काय करू नये.

धनत्रयोदशीला काय करावे? Dhantrayodashi 2025

1) धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी सोने चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे तुमची संपत्ती 13 पट वाढते असे म्हटले जाते.

2) या दिवशी पितळेची किंवा तांब्याची भांडी खरेदी करणे सुद्धा चांगलं असते. याचे कारण म्हणजे पितळ हा भगवान धन्वंतरीचा धातू मानला जातो.

3) धनत्रयोदशीच्या दिवशी (Dhantrayodashi 2025) नवीन झाडू खरेदी करणे सुद्धा शुभ मानले जाते. नवीन झाडूच्या खरेदीमुळे घरातील गरिबी दूर होते.

4) या दिवशी धणे खरेदी केल्याने प्रचंड संपत्ती मिळते.

5) धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने कुटुंबातील सदस्यांना चांगली आणि निरोगी आरोग्य मिळते.

6) या दिवशी लक्ष्मी माता आणि कुबेर यांची पूजा केल्याने आर्थिक भरभराट होते.

धनत्रयोदशीला काय करू नये??

1) धनत्रयोदशीच्या दिवशी चाकू, कात्री किंवा लोखंडापासून बनवलेल्या धारदार किंवा टोकदार वस्तू खरेदी करणे टाळा, कारण सणासुदीला लोखंड खरेदी करणे अशुभ मानले जाते.

2) या दिवशी काचेच्या वस्तू किंवा प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करणे टाळा.

3) धनत्रयोदशीच्या दिवशी कोणालाही वस्तू किंवा पैसे उदार देऊ नका . कारण असे केल्याने घरातील लक्ष्मी दूर जाईल.

4) या शुभ दिवशी घरात कोणाशीही भांडण करू नका किंवा कोणाचाही अपमान करू नका.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News