BhauBeej 2025 : यंदा भाऊबीजेचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या…

Asavari Khedekar Burumbadkar

दिवाळीचा पाच दिवसांचा सण भाऊबीज झाली की संपतो. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणाऱ्या या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी बहिण भावाला औक्षण करते, भाऊ-बहीण एकमेकांना भेटून प्रेम, स्नेह आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतात. या वर्षी भाऊबीजचा पवित्र सण 23 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. जाणून घ्या राहुकालाची वेळ, शुभ मुहूर्त, पूजा विधी..

भाऊबीज कधी आहे?

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला 22 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजून 16 मिनिटांनी सुरु होईल. तर, 23 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजून 46 मिनिटांनी हा मुहूर्त संपेल. त्यामुळे यंदा 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीजेचा सण साजरा केला जाणार आहे.

राहुकाळाची वेळ

पंचांगानुसार 23 ऑक्टोबर रोजी राहुकाल दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरू होऊन 2 वाजून 54 मिनिटांनी संपेल. या काळात कोणतेही पूजन किंवा शुभ काम करू नये.

भाऊबीजचे शुभ मुहूर्त

  • पहिला शुभ मुहूर्त दुपारी 1 वाजून 13 मिनिटांपासून 3 वाजून 28 मिनिटांपर्यंत असेल.
  • दुसरा अभिजित मुहूर्त सकाळी 11 वाजून 43 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 28 मिनिटांपर्यंत असेल.
  • तिसरा विजय मुहूर्त दुपारी 1 वाजून 58 मिनिटांपासून 2 वाजून 43 मिनिटांपर्यंत राहील.
  • तर चौथा गोधूली मुहूर्त सायंकाळी 5 वाजून 43 मिनिटांपासून 6 वाजून 09 मिनिटांपर्यंत असेल.

भाऊबीज पूजन विधी

  • सर्वप्रथम पूजेची थाळी स्वच्छ धुऊन घ्यावी.
  • थाळी गोल आकाराची असावी.
  • थाळीच्या मधोमध दिवा ठेवावा. दिव्याच्या चारही बाजूंना पूजा सामग्री म्हणजे श्रीफळ, हळद-कुंकूचा करंडा, फुले, मिठाई, विडा, सुपारी, अक्षता ठेवावे.
  • भावाला चौरंगावर बसवून बहिणीने सर्वप्रथम भावाच्या कपाळी लाल कुंकवाचा टिळा लावावा.
  • कपाळी टिळा लावल्यानंतर डोक्यावर अक्षता टाकाव्या.
  • औक्षणानंतर, भाऊ-बहिणींनी एकमेकांना भेटवस्तू द्याव्यात आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा द्याव्यात.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या