BhauBeej 2025 : भाऊबीज का साजरी केली जाते, शुभ मुहूर्त, महत्व, त्यामागील पौराणिक कथा काय आहे? जाणून घ्या…

भाऊबीज 2025 यंदा 23 ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहे. जाणून घ्या राहुकालाची वेळ, शुभ मुहूर्त, पूजा विधी..

भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक मानला जाणारा सण म्हणजे भाऊबीज. हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाला टिलक लावून ओवाळते व त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक नात्याचे महत्त्व सांगणारा एक सणआहे,तर भावा-बहिणीच्या नात्याचा आनंद द्विगुणीत करणारे दोन सण आपल्याकडे साजरे होतात. एक म्हणजे रक्षाबंधन आणि दुसरा भाऊबीज. दिवाळीचा शेवटचा दिवस असलेल्या भाऊबीजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजन, दिप पूजन, वसुबारस यांसोबतच दिवाळी पाडवा आणि भाऊबीजही साजरी केली जाते. पण दिवाळीत भाऊबीज का साजरी केली जाते, त्यामागील पौराणिक महत्त्व काय आहे हे जाणून घेऊयात…

भाऊबीजेची पौराणिक कथा काय आहे?

पौराणिक कथेनुसार, सूर्यदेवाची पत्नी संग्या हिला दोन मुले होती. मुलगा यमराज आणि मुलगी यमुना. बहीण यमुना आपले भाऊ यमराजावर खूप प्रेम करत असे आणि त्याला आपल्या घरी येण्याची विनंती करत असे, परंतु आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे यमराज आपल्या बहिणीच्या घरी जाऊ शकले नाहीत. एकदा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला यमराज बहीण यमुनेच्या आमंत्रणावरून तिच्या घरी पोहोचले. बहिणीच्या घरी गेल्याच्या आनंदात यमराजांनी नरकवासीयांना एक दिवसासाठी मुक्त केले. यमराज घरी पोहोचल्यावर यमुनेने आपल्या भावाचे मोठ्या आदराने स्वागत केले आणि त्याच्या स्वागतासाठी विविध पदार्थ तयार केले आणि यमराजाला  औक्षवण केले. जेव्हा यमराज यमुनेच्या घरातून निघू लागले तेव्हा त्यांनी बहिणीला तिच्या पसंतीचा वर मागायला सांगितले. आपल्या आवडीचा वर मागण्याऐवजी बहीण यमुना यमराजाला म्हणाली, “भाऊ, मला वचन दे की तू दरवर्षी माझ्या घरी येशील.” यमराजाने आपल्या बहिणीला हे वचन दिले होते, त्यानंतर भाऊबीज पारंपारिकपणे साजरी केली जाते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News