दिवाळीचे पाचही दिवसाचे वेगवेगळे महत्त्व आहे. दिवाळीच्या पाचव्या दिवशी भाऊबीज असते. बहीण भावाच्या नात्याचे बंध जोपासणारा असा हा सण. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. या खास दिवशी बहिण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि त्याला ओवाळते तर भाऊ बहिणीला आशीर्वाद आणि प्रेम म्हणून छान भेटवस्तू देतो. तुम्हालाही या वर्षी बहिणीला काय गिफ्ट द्यावं, असा प्रश्न पडला का? मग हे जाणून घ्या..
साडी
भाऊबीजेला बहिणीला गिफ्ट देण्यासाठी साडी हा एक उत्तम पर्याय आहे. बहिणीच्या आवडीनुसार तुम्ही रेशमी, कॉटन किंवा डिझायनर साडी निवडू शकता, जे तिला नक्की आवडेल. साडीसोबत तुम्ही एक सुंदर गिफ्ट कार्ड किंवा तिच्या आवडीच्या वस्तू निवडण्यासाठी तिच्यासाठी एक खास भेटही देऊ शकता.

मेकअप किट
या भाऊबीजेला बहिणीला काय गिफ्ट द्यावं, या प्रश्नाचं उत्तर म्हणून तुम्ही तिला मेकअप किट देऊ शकता, कारण ज्या बहिणींना मेकअपची आवड आहे त्यांना हे गिफ्ट नक्कीच आवडेल.
घड्याळ
या भाऊबीजेला बहिणीला भेट देण्यासाठी अनेक छान पर्याय आहेत, ज्यात घड्याळाचाही समावेश आहे. घड्याळ हे एक उत्तम आणि उपयुक्त गिफ्ट आहे, कारण ते तिच्या गरजेनुसार वापरले जाऊ शकते. घड्याळ हे एक उपयुक्त आणि स्टायलिश गिफ्ट आहे. तुम्ही तिच्या आवडीनुसार स्टायलिश किंवा क्लासिक डिझाइनचे घड्याळ निवडू शकता.
वॉलेट
प्रत्येक मुलीच्या बॅगमध्ये वॉलेट असते. त्यामुळे या भाऊबीजेला तिला नव्या स्टाईलचे वॉलेट किंवा पर्स गिफ्ट करुन तुम्ही तिला खूश करू शकता. पर्स, वॉलेट यांसारख्या गोष्टी मुलींसाठी अतिशय गरजेच्या असतात. सध्या बाजारात ब्रँडेड अशा बऱ्याच छान प्रोफेशनल किंवा कॅज्युअल-पार्टी लूक देणाऱ्या पर्स मिळतात. यातला एखाद्या पर्याय तुम्ही बहिणीसाठी नक्की निवडू शकता.
ज्वेलरी
जर तुमच्या बहिणीला ज्वेलरी आवडत असेल तर तुम्ही भाऊबीजेला तिला ज्वेलरी गिफ्ट करू शकता. ज्वेलरीमध्ये बरेच ऑप्शन असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटनुसार गिफ्ट करू शकता.











