दिवाळीनंतर भाऊबीज साजरी केली जाते. भाऊबीज हे भाऊ आणि बहिणीतील अतूट नात्याला अजून सुरक्षित करणारे सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभण्यासाठी, त्याच्या उज्जवल भविष्यासाठी पूजा करते. या दिवशी भाऊ बहीण दोन्ही एकमेकांना भेटवस्तू देतात, गोड भरवतात. दिवाळीला खूप गोडधोड खाल्ल्यानंतर गोड खाण्याचा कंटाळा येतो. अशा वेळी या भाऊबीजला तुमच्या भावासाठी पिझ्झा बनवा. या भाऊबीजेला भावासाठी पिझ्झा बनवण्यासाठी, तुम्ही तव्यावर झटपट तयार होणाऱ्या व्हेज पिझ्झाची रेसिपी फॉलो करू शकता. जाणून घ्या रेसिपी….
साहित्य
- टोमॅटो
- बारीक चिरलेला कांदा
- ओरेगॅनो
- टोमॅटो केचअप
- बारीक चिरलेला लसूण
- लाल तिखट
- साखर
- ऑलिव्ह तेल
- मीठ – चवीनुसार
- पिझ्झा बेस – २
- किसलेले मोझेरेला चीज
- तुळशीची पाने
- ऑलिव्ह तेल
कृती
- सर्वप्रथम टोमॅटोला गरम पाण्यात उकडून घ्या. टोमॅटो उकड्ल्यानंतर त्याची साले काढून एका प्लेटमध्ये ठेऊन द्या. यानंतर टोमॅटोचे काप करा आणि त्यातील बिया काढून टाका. मिक्सरच्या भांड्यात टोमॅटोची चांगली पेस्ट तयार करा. आणि ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्या.
- एका नॉनस्टिक पॅनमध्ये १ चमचा ऑलिव्ह तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात लसूण घालून सोनेरी रंग येऊपर्यंत परतून घ्या. लसूण परतून झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. कांद्याचा रंग बदलल्यानंतर त्यात टोमॅटोची पेस्ट टाका. नंतर ओरेगॅनो अर्धा टीस्पून, टोमॅटो केचअप २ चमचे, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. मिक्स झाल्यानंतर २ ते ३ मिनिटे चांगले शिजवून घ्या. शेवटी साखर घाला आणि मिक्स करा. अशा प्रकारे पिझ्झा सॉस रेडी.
- पिझ्झा बनवण्यासाठी जाड क्रस्ट पिझ्झा बेस घ्या. त्या बेसवर तयार पिझ्झा सॉस पसरवा. हा पिझ्झा सॉस बेसवर सामान कडेने पसरवावे. आता त्यावर अर्धा कप चीज टाका. यानंतर तुळशीच्या पानांचे तुकडे पिझ्झा बेसवर पसरवा. त्यावरून अर्धा चमचा ऑलिव्ह तेल पसरवा. सगळं मिश्रण टाकल्यानंतर पिझ्झा बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये १८० डिग्री सेल्सिअसवर १०-१२ मिनिटे बेक करा. यानंतर ट्रे बाहेर काढा. चवदार मार्गारिटा पिझ्झा तयार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)
