भावाच्या बहिणीच्या नात्यातील प्रेमळ सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला छान छान गिफ्ट देतात. या आनंदाच्या दिवसाच्या निमित्ताने घराघरात सारे कुटुंबीय एकत्र येतात. गोडाधोडाच्या पदार्थाने मेजवानी केली जाते. बहिण भाऊ एकमेकांना भेटवस्तू देतात. या दिवशी बहीण भावाला छान छान पदार्थ बनवून खाऊ घालते. मग यावर्षी तुम्ही या आनंदाच्या दिवसाची रंगत वाढवणार असाल तर आज आम्ही तुम्हाला अॅपल रबडी कशी बनवायची ह्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत…
साहित्य
- २ सफरचंद
- ५०० मि.ली. दूध
- १/४ कप साखर (चवीनुसार)
- १/२ चमचा वेलची पूड
- काजू आणि बदामचे काप (ऐच्छिक)
कृती
- सफरचंदांची साल काढून बारीक किसून घ्या आणि एका भांड्यात ठेवा.
- एका जाड बुडाच्या भांड्यात दूध उकळायला ठेवा.
- दुध थोडे घट्ट झाल्यावर त्यात साखर आणि वेलची पूड घाला.
- किसलेले सफरचंद दुधात घालून मिश्रण एकजीव होईपर्यंत हलवत राहा.
- थंड झाल्यावर काजू आणि बदामच्या कापांनी सजवून सर्व्ह करा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)
