दिवाळी हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पाच दिवस चालणारा उत्सव धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबीजच्या दिवशी संपतो. यावेळी बाजारातून मिठाई आणण्याऐवजी घरीच काही साध्या सोप्या रेसिपी ट्राय करू शकता. बदामाची खीर ही बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागते आणि ती कमी वेळात तयार होते, त्यामुळे दिवाळीच्या सणासुदीला हा एक चांगला पर्याय आहे.
साहित्य
- बदाम
- खवा
- दूध
- साखर
- वेलची पूड
- ड्राय फ्रूट्स (बदाम, काजू, पिस्ता, इत्यादी): तुमच्या आवडीनुसार
कृती
- बदामाची साल काढून घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या किंवा पेस्ट बनवा.
- एका जाड बुडाच्या भांड्यात दूध गरम करायला ठेवा. दुधाला उकळी येऊ लागली की त्यात खवा घाला आणि तो पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत राहा.
- आता त्यात बदामाची पेस्ट आणि साखर घाला. साखर विरघळेपर्यंत ढवळत राहा.
- मिश्रण घट्ट होईपर्यंत आणि खीर एकजीव होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा.
- खीर शिजल्यावर त्यात वेलची पूड आणि बारीक चिरलेले ड्राय फ्रूट्स घाला. चांगले मिसळा.
- गरमागरम किंवा थंडगार सर्व्ह करा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)












