दिवाळी पाडव्यानंतर बहीण भावाच्या प्रेमाचा सण म्हणजे भाऊबीज. दिवाळीचा पाच दिवसांचा सण भाऊबीज झाली की संपतो. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणाऱ्या या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी बहिण भावाला औक्षण करते, भाऊ-बहीण एकमेकांना भेटून प्रेम, स्नेह आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतात. अशा या शुभ दिवशी भाऊबीजेला बहीण भावाला द्या खास मराठीतून शुभेच्छा..
भाऊबीजेचे महत्त्व
हा सण भाऊ-बहिणीच्या नात्याला दृढ करतो. या दिवशी बहिणी भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करतात. भाऊबीजला यम द्वितीय असेही म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी यमराज त्यांची बहीण यमुनेच्या घरी गेले होते. यमुनेने त्यांचे भोजन करून स्वागत केले आणि तिलक लावला. यावर प्रसन्न होऊन यमराज म्हणाले की, या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीकडून तिलक लावेल त्याला दीर्घायुष्य आणि सुख आणि समृद्धी मिळेल. तेव्हापासून, भावा-बहिणीचे नाते दृढ करण्यासाठी दरवर्षी हा सण साजरा केला जातो.

भाऊबीजेच्या शुभेच्छा…
आली आज भाऊबीज ओवाळते भाऊराया
राहू दे रे नात्यामध्ये स्नेह, आपुलकी माया
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!
वाट नवी, नव्या दिशा मिळो
तुझ्या कर्तृत्वाला धन संपदा आणिक यश, कीर्ती लाभो
भाऊराया तुला… भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा..!
नाते भाऊ बहिणीचे
नाते पहिल्या मैत्रीचे
बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
सोनेरी प्रकाशात पहाट झाली
आनंदाची उधळण, करत भाऊबीज आली
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
बहिणीची असते भावावर अतूट माया
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया
भावाची असते बहिणीला साथ
मदतीला देतो नेहमीच हात
सण पवित्र नात्याचा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा सण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे भाऊबीजेचा पवित्र सण..
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे
भाऊबीज निमित्त सर्वांना मनस्वी शुभेच्छा!
चंदनाचा टिळा, मिठाईचा गोडवा
बहिणीचे प्रेम, भावाची एकमेव आशा
भाऊबीजेचा सण तुम्ही आनंदाने करा साजरा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!
भाऊबीजेचा सण खूप आहे खास
नात्याबाबत मनामध्ये सच्चा आहे विश्वास
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!
बहिणीला हवी असते भावाची माया
नको असतात महागड्या भेटवस्तू
नाते शतकानुशतके राहू दे अतूट
माझ्या भावाला मिळो अपार सुख
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!
सूर्याची किरणे, आनंदाचा वर्षाव
चंद्राचे चांदणे, प्रियजनांचे प्रेम
भाऊबीजेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
भाऊबीजेची भेट नक्कीच खूप आहे खास
आपल्या नात्यात असाच कायम टिकून राहो गोडवा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रेम आणि विश्वासाचे नाते करा साजरे
तुमच्या प्रत्येक ईच्छा होवोत पूर्ण
भाऊबीजेचा सण आहे, दादा लवकर ये घरी
तुझ्या लाडक्या ताईला करायचीय मायेची ओवाळणी
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !
जग तुझ्या मुठीत राहो
तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत
जीवनातील अडचणी नष्ट होवोत
लाभो तुला सर्व सुख-शांती-समृद्धी
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)