आश्विन महिन्यातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. या सणाला धनतेरस किंवा धनत्रयोदशी असे म्हणतात..दिवाळीचा सण जवळ आला आहे. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला खूप महत्त्व असते. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी पूजाही केली जाते. धनत्रयोदशीला धन्वंतरी पूजा करण्यामागचं काय कारण आहे, ते जाणून घेऊयात…
धनत्रयोदशीला धन्वंतरी पूजा करण्याचं महत्त्व
धनत्रयोदशीचा दिवशी धन्वंतरीची पूजा करुन आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा आशिर्वाद मिळावा, अशी मागणी केली जाते. धन्वंतरीची कृपा मिळवण्यासाठी हा शुभ काळ मानला जातो. धनत्रयोदशीला धन्वंतरी पूजा केल्यामुळे वर्षभर आरोग्य चांगलं राहतं. रोगांपासून मुक्ती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. समुद्र मंथनाच्या वेळी धन्वंतरीचा जन्म आयुर्वेदिक औषधांच्या निमिर्तीसाठी झाला. त्यानंतर धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा करण्याची परंपरा सुरु झाली.

धनत्रयोदशीचं महत्त्व
धनत्रयोदशीला आरोग्याचे देव धन्वंतरी, संपत्तीसाठी देवी लक्ष्मी आणि समृद्धीसाठी भगवान कुबेर यांची पूजा केली जाते, कारण हा दिवस देवांचे वैद्य धन्वंतरींच्या प्रादुर्भावाशी आणि आरोग्यासोबतच भौतिक संपत्तीचं महत्त्व दर्शवतो. या दिवशी घराची स्वच्छता करून दिवे लावले जातात, सोने-चांदीसारख्या वस्तू खरेदी केल्या जातात आणि यमराजासाठी दीपदान केले जाते, ज्यामुळे आरोग्याची व समृद्धीची भरभराट होते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











