हिंदू परंपरेनुसार दिवाळीचा पाच दिवसांचा उत्सव कार्तिक महिन्याच्या त्रयोदशीपासून सुरू होतो. या दिवसाला धनतेरस किंवा धनत्रयोदशीदेखील म्हणतात. धनत्रयोदशी आणि दिवाळीसाठी लोक आधीच तयारी करत असतात. या विशेष दिवशी आई लक्ष्मी, भगवान धन्वंतरि आणि कुबेर यांची पूजा केली जाते. धनतेरसच्या दिवशी विशेषतः भगवान धन्वंतरी आणि धनदेवतेची पूजा केली जाते. दिवाळीच्या विशेष प्रसंगी घरात आनंद आणि समृद्धी टिकून राहावी म्हणून लक्ष्मीमातेला नैवेद्य अर्पण केला जातो. या दिवशी प्रसादासाठी तुम्ही देखील बुंदीचे लाडू बनवू शकता पाहा सोपी रेसिपी…
साहित्य
- बेसन (चणा डाळीचे पीठ)
- तेल
- साखर
- पाणी
- केशर
- वेलची पावडर
कृती
- एका भांड्यात बेसन घ्या आणि त्यात हळूहळू पाणी घालून गुठळ्या न राहता बुंदी तयार करण्यासाठी पुरेसे घट्टसर मिश्रण तयार करा.
- कढईत तेल गरम करा. बुंदीचा झारा घ्या, त्यावर तयार केलेले बेसनचे मिश्रण घालून तेलात बुंदीच्या लहान गोल आकाराच्या थेंबाप्रमाणे पाडा.
- बुंदी सोनेरी रंगाची झाल्यावर ती तेलातून काढून घ्या. साखरेचा पाक (एका तारेचा पाक) तयार करून घ्या.
- तळलेली बुंदी गरम पाकात घाला. त्यात वेलची पावडर आणि केशरी रंग मिसळा. मिश्रण थोडे कोमट असतानाच लाडू वळा.












