Diwali 2025 : भाजणीचा वापर न करता बनवा कुरकुरीत बटर चकली

भाजणीचे पीठ बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये बटर चकली बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. जाणून घ्या चकली बनवण्याची रेसिपी.

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येत आहे. हा दिव्यांचा उत्सव दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. महिलांची फराळाची तयारी जोरदार सुरु आहे. जवळपास दिवाळीचा फराळ बनवून तयार झाला आहे. अशात जर तुम्हाला आणखी काही चटपटीत करायचं असेल, तर आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहे. फराळातील चकली बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. कारण चकली बनवण्यासाठी भाजणीचे पीठ तयार करावे लागते. भाजणीचे पीठ बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये बटर चकली बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. जाणून घ्या चकली बनवण्याची रेसिपी….

साहित्य

  • बटर
  • कलोंजी
  • ओवा
  • तांदळाचे पीठ
  • तेल
  • मीठ
  • पाणी

कृती

  • बटर चकली बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या ताटात तांदळाचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ, बेकिंग सोडा, बेसन तसेच चिमूटभर हिंग घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्यात ओवा, बटर, कलोंजी घालून पाण्याला उकळी काढून घ्या. पाण्याला व्यवस्थित उकळी आल्याशिवाय गॅस बंद करू नये.
  • उकळी आलेल्या पाण्यात तयार करून घेतलेले तांदळाचे पीठ टाकून वाफवण्यासाठी ठेवा. १५ ते २० मिनिटं पिठाला वाफ काढून घ्या.
  • वाफवून घेतलेले पीठ मोठ्या ताटात काढून मळून घ्या. त्यानंतर मळून घेतलेल्या पिठाच्या चकल्या पडून घ्या.
  • कढईमधील गरम तेलात चकल्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेल्या बटर चकली.

About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News