दिवाळीच्या दिवशी फराळाच्या ताटात जर चिवडा नसेल तर फराळाचे ताट अपूर्ण राहिल्यासारखे वाटते. त्यामुळे यंदाच्या दिवाळीमध्ये या पद्धतीने बनवा पातळ पोह्यांचा खमंग चिवडा. दिवाळीच्या दिवसांमध्ये या पोह्यांची चव वेगळीच लागते. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही पातळ पोह्यांचा चिवडा बनवू शकता. यंदाची दिवाळी आणखीन स्पेशल करण्यासाठी तुम्ही या पद्धतीची वापर करून पोह्यांचा चिवडा बनवू शकता. अनेकदा चिवडा कुरकुरीत बनत नाही. लगेच नरम होऊन जातो. चला तर जाणून घेऊया पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा बनवण्याची सोपी रेसिपी..
साहित्य
- पातळ पोहे
- शेंगदाणे
- कढीपत्ता
- सुक्या खोबऱ्याचे तुकडे
- मीठ
- साखर
- तेल
- चाट मसाला
- काजू बदाम
- चिवडा मसाला
- भाजलेली चणा डाळ
- हळद
कृती
- पोह्यांचा कुरकुरीत चिवडा बनवण्यासाठी पातळ पोहे स्वच्छ करून घ्या. त्यानंतर मंद आचेवर पोहे व्यवस्थित भाजा.
- कढईमध्ये तेल टाकून गरम तेलात काजू, बदाम, सुक्या खोबऱ्याचे तुकडे, शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्या.
- शेंगदाणे भाजताना जास्त वेळ भाजू नये. जास्त वेळ भाजल्यास शेंगदाणे काळे होऊ शकतात.
- नंतर त्याच तेलात मोहरी टाकून फोडणी घ्या. नंतर त्यात कढीपत्ता आणि हळद,हिरव्या मिरच्या टाकून भाजून घ्या.
- भाजून झाल्यानंतर त्यात भाजून थंड करून घेतलेले थंड पोहे टाकून मिक्स करा.
- नंतर त्यात भाजून घेतलेले सर्व साहित्य आणि चवीनुसार मीठ, साखर टाकून मिक्स करा.
- तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पोह्यांचा कुरकुरीत चिवडा.












