दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो. त्यामुळे दिवाळीच्या आधी घराची सफाई करतात. याकाळात वास्तुनुसार सफाई करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. लवकरच दिवाळीचा सण सुरु होणार आहे. त्यापूर्वी आपण घराची योग्यप्रकारे सफासफाई करतो. बरेचदा साफसफाई करताना आपण अशा काही गोष्टी पुन्हा घरात ठेवतो ज्यामुळे आपल्या नकारात्मक ऊर्जा घरात सहज प्रवेश करते. दिवाळीच्या काळात घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायला हवी. दिवाळीपूर्वी घरातून कोणत्या वस्तू फेकून द्यायला हव्या जाणून घेऊया.
तुटलेला आरसा
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तुटलेला आरसा ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा पसरते. तसेच अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे दिवाळीपूर्वीच तुटलेला आरसा आणि घड्याळ घराबाहेर फेकून द्या. घरात कोणतीही वस्तू तुटलेल्या अवस्थेत नसावी; विशेषतः तुटलेला आरसा.

बंद पडलेली घड्याळे
वास्तुशास्त्रानुसार घरात बंद पडलेली घड्याळे काढून टाकणे शुभ मानले जाते कारण ती प्रगती थांबवतात आणि घरात नकारात्मकता आणतात. त्यामुळे, दिवाळीच्या स्वच्छतेच्या निमित्ताने बंद पडलेली घड्याळे घराबाहेर काढून टाका, जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा आणि प्रगतीचा मार्ग खुला होईल. घड्याळाचे काटे आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यास शिकवतात. बंद घड्याळे आयुष्यातील अडथळे आणि थांबलेल्या प्रगतीचे प्रतीक मानली जातात.
जुने बूट-चप्पल
बुटांच्या कपाटात फाटलेले बूट किंवा चप्पल असेल तर दिवाळीपूर्वीच घराबाहेर फेकून द्या. दिवाळीच्या साफसफाईत जुने व फाटके बूट-चप्पल काढून टाकणे शुभ मानले जाते, कारण ते घरात नकारात्मक ऊर्जा आणतात आणि घरात लक्ष्मीचा वास राहत नाही. घराची स्वच्छता राखण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी जुने बूट-चप्पल काढून टाकावेत.
देवी-देवतांच्या खंडित मूर्ती
घरात किंवा मंदिरात कोणत्याही देवाची तुटलेली मूर्ती असेल तर दिवाळीपूर्वीच तिचे विसर्जन करा. वास्तुनुसार तुटलेली मूर्ती घरात ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जुन्या किंवा खंडित मूर्ती घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येऊ शकते, म्हणून त्यांची विल्हेवाट लावणे शुभ मानले जाते. तुटलेल्या मूर्तींना कोणत्याही पवित्र झाडाच्या पायथ्याशी आदराने ठेवावे, असे मानले जाते की त्या पुन्हा निसर्गात विलीन होतात. मूर्ती नदी किंवा समुद्र यांसारख्या पवित्र जलाशयात आदरपूर्वक विसर्जित कराव्यात.
गंजलेल्या वस्तू
गंजलेल्या लोखंडाच्या वस्तू घरात ठेवू नका. वास्तुशास्त्रात असे म्हटले जाते की, यामुळे घरात नकारात्मक परिणाम होतात. तसेच घरामध्ये टेबल, खुर्चीसारखे न वापरणाऱ्या गोष्टी देखील फेकून द्याव्यात. वास्तुशास्त्रानुसार, घरात गंजलेला लोखंड ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे दिवाळीच्या साफसफाईत गंजलेले लोखंड घरातून बाहेर काढून टाका. असे लोखंड घरात ठेवल्याने जीवनात शनिचा प्रकोप वाढतो. त्यामुळे तुमच्या घरात जुने, गंजलेले लोखंडी सामान असेल तर ते लगेच काढून टाका.
सुकलेली रोपे
सुकलेली रोपे घरातून लगेच काढून टाकावीत, कारण ती घरात वास्तुदोष निर्माण करतात आणि घरात नकारात्मकता आणतात. ही रोपे काढून टाकणे हा दिवाळीच्या पारंपरिक साफसफाईचा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण घरात स्वच्छता आणि सकारात्मकता राखणे महत्त्वाचे मानले जाते.











