दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दिवाळीच्या दिवशी घरात रोषणाई करून दिव्यांची सजावट,कंदील आणि रांगोळी काढली जाते. याशिवाय नवीन कपडे आणि घरात दिवाळीचा फराळ बनवला जातो. दिवाळीच्या आधी प्रत्येक घरात साफसफाई आणि फराळाची मोठी लगबग असते. दिवाळीच्या फराळात लाडू, चकल्या, करंज्या, शंकरपाळ्या इत्यादी पदार्थ बनवले जातात. या पदार्थांसोबतच तुम्ही बनवा तांदळाचे बोर जाणून घ्या कसे बनवावे…
साहित्य
- तांदुळ
- गरम पाणी
- रवा
- भाजलेले तीळ
- वेलची पूड
- भाजलेले खोबरे
- गूळ
- पिठी साखर
कृती
- तांदळाच्या पिठाची बोरं बनवण्यासाठी सर्वप्रथम 1 वाटी तांदूळ घेऊन मंद आचेवर भाजून घ्या. गॅसची फ्लेम जास्त करू नये.
- त्यानंतर भाजून घेतलेले तांदूळ थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक पावडर तयार करून घ्या.
- ताटात तांदळाचे पीठ घेऊन त्यात गरम पाणी टाकून पीठ चमच्याने मिक्स करून घ्या. नंतर त्यात रवा, भाजलेले तीळ, चवीनुसार वेलची पूड, भाजेलेलं खोबरं घालून पुन्हा एकदा मिक्स करा.
- भांड्यात पाणी घेऊन त्यात गूळ आणि पिठीसाखर मिक्स करून घ्या. साखर आणि गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत मिक्स करत राहा.
- नंतर तयार केलेल्या पिठामध्ये गुळाचे पाणी आवश्यकतेनुसार ओतून मिक्स करा. जास्त पातळ पीठ मळू नये.
- मळून घेतलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून गरम तेलात तळून घ्या.
- तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली तांदळाच्या पिठाची गोड बोरं.












