जेव्हा ग्रह विशिष्ट कोनात भ्रमण करतात तेव्हा ते अद्वितीय शुभ योग निर्माण करतात. त्यांचे परिणाम वेगवेगळ्या राशीनुसार, व्यक्तींवर, त्यांच्या जीवनावर होत असतात. यंदाच्या दिवाळीला सुद्धा असाच एक खास योग (Diwali 2025 Rashi Bhavishya) जुळून आला आहे ज्याला आपण नवपंचम राजयोग असं म्हणू शकतो. हा राजयोग म्हणजे संपत्ती, सौभाग्य आणि यशाचे प्रतीक आहे. १४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७:३४ वाजता, शुक्र आणि युरेनस एकमेकांपासून १२० अंशाच्या कोनात असतील. ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी युरेनस वृषभ राशीत आणि शुक्र कन्या राशीत असेल. ही युती खालील राशींसाठी सकारात्मक परिणाम देईल.
१) मिथुन
नवपंचम राजयोग मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक भरभराट करेल. या लोकांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी येईल. शुक्र तुमच्या राशीतून चौथ्या घरात भ्रमण करेल, ज्यामुळे कौटुंबिक जीवनात सुसंवाद आणि आर्थिक स्थिरता वाढेल. पती पत्नीमध्ये प्रेमाचे नाते पाहायला मिलेल. जर तुमचे कोणासोबत अनेक वर्षांपासून काही वादविवाद असतील तर ते सुद्धा मिटतील. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याची आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे.

२) सिंह Diwali 2025 Rashi Bhavishya
सिंह राशीसाठी नवपंचम राजयोग अत्यंत शुभ आहे. सिंह राशीच्या लोकांना नवपंचम राजीव भागामुळे आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता आहे अचानकपणे कुठूनही पैसा येईल आणि तुमच्या जवळ राहील. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अतिशय अनुकूल राहणार असून शैक्षणिक यश दर्शवणारा असेल. व्यावसायिकदारांसाठी नवीन प्रोजेक्ट मिळतील उत्पन्नाचे नवनवीन स्त्रोत निर्माण होतील. समाजात तुमचा मान सन्मान आणि आदर वाढेल. नवीन लोक जोडली जातील. (Diwali 2025 Rashi Bhavishya)
३) कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग प्रगतीचा आणि भाग्याचा ठरेल. जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय उत्तम असेल. नवीन गाडी किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. जुने मित्र भेटते आणि कुठेतरी बाहेर प्रवासाचा योग जोडून येईल. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. जुन्या माणसांच्या भेटीगाठी होतील.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











