Diwali 2025 : यंदा 5 नव्हे तर 6 दिवसांची दिवाळी; पहा प्रत्येक दिवसाचे महत्त्व

तसं बघितलं तर दिवाळी ही पाच दिवसांची असते. धनत्रयोदशीपासून सुरू होणारा हा सण भाऊबीज पर्यंत चालतो. परंतु यंदाची दिवाळी ही 18 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर पर्यंत,म्हणजेच 5 ऐवजी 6 दिवसांची असणार आहे.

दिवाळी (Diwali 2025) हा आपला आवडता सण. दरवर्षी आपण अगदी आतुरतेने दिवाळीची वाट बघत असतो. यावर्षी 20 ऑक्टोबरला दिवाळी साजरी केली जाणार असून सर्वत्र दिवाळीच्या तयारीची लगबग पाहायला मिळतेय. तसं बघितलं तर दिवाळी ही पाच दिवसांची असते. धनत्रयोदशीपासून सुरू होणारा हा सण भाऊबीज पर्यंत चालतो. परंतु यंदाची दिवाळी ही 18 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर पर्यंत,म्हणजेच 5 ऐवजी 6 दिवसांची असणार आहे. यातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व मोठे आहे. आज आपण जाणून घेऊया 18 ते 23 ऑक्टोबर पर्यंत कोणत्या दिवशी कोणता सण साजरा केला जाईल.

१८ – १९ ऑक्टोबर, धनत्रयोदशी

मुळात दिवाळीची सुरुवातच धनत्रयोदशीपासून होते. हा दिवस भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि कुबेर यांच्या पूजेसाठी समर्पित असतो. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदीचे दागिने खरेदी करणे, तसेच नवीन गाडी घेणे शुभ मानले जाते. संध्याकाळी दिवे लावून उत्सवाची सुरुवात होते.

२० ऑक्टोबर, दिवाळी: Diwali 2025

यंदाची दिवाळी ही 20 ऑक्टोबरला आहे. या दिवशी घरामध्ये लक्ष्मी देवीची आणि गणपती बाप्पाची पूजा केली जाते. सर्वत्र पणत्या लावल्या जातात. या माध्यमातून अंधारातून प्रकाशाचा विजय साजरा केला जातो. प्रत्येकाच्या घरात गोडधोड पदार्थ बनवले जातात.

२१ ऑक्टोबर, अमावस्या:

या दिवशी दिवसभर अमावस्या तिथी असेल. परंपरेनुसार, अमावस्येला कोणतीही पूजा केली जात नाही. म्हणून, दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाईल.

२२ ऑक्टोबर, गोवर्धन पूजा:

या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. गोवर्धन पूजाला अन्नकूट पूजा देखील म्हणतात. पूजेसाठी घराच्या प्रांगणात गोवर्धन नाथांच्या पुतळ्यावर रोली, तांदूळ, खीर, बेताशे, पाणी, दूध, फुले अर्पण करून दिवे लावले जातात. हा उत्सव निसर्ग, अन्न आणि देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक खास क्षण असतो. Diwali 2025

२३ ऑक्टोबर, भाऊबीज:

दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज… बहिण आणि भावामधील प्रेमाचे आणि स्नेहाचे  प्रतीक दाखवणारा हा दिवस… भाऊबीज च्या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते. आणि भावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते आणि भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला खास असे गिफ्ट देतो.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News